आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • OIC Meeting On Kashmir; Pakistan Claims, 57 member Organisation Supports Pakistan On Kashmir Issue

काश्मीरबाबत ओआयसीचे संमेलन; पाकचा दावा, काश्मीर मुद्द्यावर 57 सदस्यीय संघटनेचा पाकिस्तानला पाठिंबा

2 वर्षांपूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक

इस्लामाबाद : ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक काे-ऑपरेशन (ओआयसी) सदस्य राष्ट्रांच्या परराष्ट्रमंत्रीस्तरीय विशेष बैठक काश्मीर मुद्द्यावर घेणार असल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे. साैदीचे परराष्ट्रमंत्री प्रिन्स फैजल फरहान व पाकिस्तानचे समकक्ष शाह महमूद कुरेशी यांच्यात झालेल्या बैठकीत हा निर्णय झाल्याचे सांगितले जाते.

गुरुवारी उभय नेत्यांत ही बैठक झाली हाेती. फैजल गुरुवारी एक दिवसाच्या पाकिस्तान दाैऱ्यावर हाेते. काश्मीरमधील सद्य:स्थितीबाबत दाेन्ही परराष्ट्रमंत्र्यांनी चर्चा केली. भारताच्या नागरिकत्व कायदा दुरुस्ती कायदा २०१९ व राष्ट्रीय नागरिकत्व नाेंदणी या दाेन्ही निर्णयांची माहिती कुरेशी यांनी साैदीला दिली. या कायद्याच्या माध्यमातून भारताने मुस्लिमांना लक्ष्य करण्याची पद्धतशीर याेजना केल्याचा कांगावादेखील कुरेशी यांनी या बैठकीतून केल्याचे सूत्रांनी सांगितले. फैजल यांनी पंतप्रधान इम्रान खान तसेच आयएसआय प्रमुख जनरल फैज हमीद यांचीही भेट घेतली. या दाैऱ्यात त्यांनी साैदी सरकारचा निराेप पाकिस्तानला दिला. तत्पूर्वी क्वालालंपूर येथे झालेल्या संघटनेच्या बैठकीत सहभागी हाेऊ शकलाे नसल्याबद्दल साैदीने दिलगिरी व्यक्त केली. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी मलेशियातील बैठकीत सहभागी हाेण्याची तयारी दर्शवली हाेती. परंतु ते हजर राहू शकले नव्हते. त्यांनी एेनवेळी बैठकीला जाणार नसल्याचे स्पष्ट केले.

वास्तविक ओआयसी मुस्लिम देशांच्या समस्यांवर ताेडगा काढण्यात अपयशी ठरल्याचे मानले जाते. दरम्यान, साैदी अरेबिया व संयुक्त अरब अमिरातीने गेल्या वर्षी पंतप्रधान खान यांना माेठी आर्थिक मदत दिली हाेती. तेव्हापासून हे संबंध अधिक बळकट हाेत असल्याचे दिसून येत आहे. खरे तर भारत-साैदी यांच्यातील व्यापारी संबंध दृढ झाले आहेत.

५७ सदस्यीय संघटनेचा पाठिंबा

५७ सदस्यीय संघटनेतील बहुतांश सदस्य राष्ट्रांनी काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे पाकिस्तानने आपली बाजू आणखी बळकटीने मांडण्यासाठी तयारी सुरू केली आहे. गेल्या आठवड्यात ओआयसीने एक पत्रक जारी करून भारतातील अल्पसंख्यांकाची गळचेपी हाेत असल्याच्या घडामाेडींकडे बारकाईने लक्ष देणार असल्याचे म्हटले हाेते.
 

बातम्या आणखी आहेत...