आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईत पेट्रोलचा सर्वाधिक भडका, दर 88 च्या जवळ तर दिल्लीत 80 च्या पार, 3 दिवसांत 1 रुपयांपेक्षा जास्त वाढ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

- सरकार एक्साइज ड्युटी घटवण्यास तयार नाही 

- काँग्रेस सोमवारी देशभरात आंदोलन करणार आहे 


नवी दिल्ली - पेट्रोल डिझेलचे दर दररोज नवनीव विक्रम रचत आहेत. दिल्लीमध्ये पेट्रोल शनिवारी 39 पैशांनी महागत 80.38 वर पोहोचले. तर मुंबईत 38 पैशांच्या दरवाढीने पेट्रोल 87.77 रुपए लीटर झाले आहे. तीन दिवसांत पेट्रोलचे दर 1 रुपयांपेक्षा जास्तने वाढले आहेत. दिल्ली आणि मुंबईमध्ये डिझेलमध्ये शनिवारी 44 आणि 47 पैसे वाढ केली. तेल कंपन्या तीन दिवसांपासून पेट्रोल-डीझेलच्या किमती वाढवत आहे. फक्त बुधवारी दर जैसे थे राहीले. त्यापूर्वी 26 ऑगस्ट ते 4 सप्टेंबरपर्यंत सलग 10 दिवस दरवाढ केली. 

 

मेट्रो शहरांतील पेट्रोलचे दर 

शहर शुक्रवारचे दर (रुपये/लीटर) शनिवारचे दर (रुपये/लीटर) वाढ
दिल्ली 79.99 80.38 39 पैसे
मुंबई 87.39 87.77 38 पैसे

मेट्रो शहरांतील डिझेलचे दर 

शहर शुक्रवारचे दर (रुपये/लीटर) शनिवारचे दर (रुपये/लीटर) वाढ
दिल्ली 72.07 72.51 44 पैसे
मुंबई 76.51 76.98 47 पैसे

4 वर्षांत एक्साइज ड्युटी 9 वेळा वाढवली, फक्त एकदा घटवली 

केंद्र सरकार पेट्रोलवर 19.48 रुपये आण डीझेलवर 15.33 रुपयांची एक्साइज ड्युटी आकारते. अखेरच्या वेळी ऑक्टोबर 2017 मध्ये एक्साइज ड्युटी 2 रुपयांनी घटवण्यात आली होती. पण 2014 पासून 2016 दरम्यान यात 9 वेळा वाढ करम्यात आली. त्यादरम्यान पेट्रोलवर एक्साइज ड्युटी 11.77 रुपये आणि डिझेलवर 13.47 रुपयांना वाढवण्यात आली. यात 3 वर्षांमध्ये सरकारचे कलेक्शन दुपटीपेक्षा जास्त झाले. आर्थिक वर्ष 2014-15 मध्ये पेट्रोल डिझेलवरील एक्साइज ड्युटीद्वारे सरकारला 99,184 कोटी रुपये मिळाले. तर 2017-18 मध्ये 2,29,019 कोटी एवढा आकडा होता. 

बातम्या आणखी आहेत...