आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सौदीच्या शेखने दिला मोदींना मोठा झटका, परत महाग होऊ शकते पेट्रोल....

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली-  जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किंमती मोठ्याप्रमानात पडल्यामुळे सौदी अरबने मोठा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतातील नागरिकांची डोके दुखी वाढण्याची शक्यता आहे. मागच्या एका महिन्यात कच्च्या तेलाच्या किमतीत 20 टक्क्याने घट झाली आहे. त्यामुळे सौदीच्या सरकार सोबत मिळून तेथील तेल उत्पादक देशांच्या संघटनेने(OPEC) पुढच्या महिन्यापासून रोज होणाऱ्या कच्च्या तेलाच्या निर्याती मधून 5 लाख बॅरेल कमी करण्याचा निर्णय घेतला आहे, आणि पुढच्या वर्षी पासून हे 10 लाख बॅरेल करण्यात येईल. या घोषणेनंतर क्रुड ऑइलच्या किमतीत 1 टक्क्याने वाढ होउन ते 71 डॅालर प्रति बॅरेलवर गेले. आणि हे अजुन वाढण्याची शक्यता आहे, या नंतर भारतात पण पेट्रोल-डिझेलचे भाव वाढण्याची शक्यता आहे.

 

सौदी अरब कमी करेल तेलाचे उत्पादन
सीएनबीसीच्या एका रिपोर्टनुसार, जगातल्या सगळ्यात मोठ्या तेल एक्सपोर्टर सौदी अरबने म्हणले आहे की, कमकुवत सीजनल डिमांडमुळे ते आता डिसेंबर पासून  क्रूडची शिपमेंट 5 लाख बॅरल प्रतिदिवस कमी करणार आहेत. सौदी अरबचे एनर्जी मिनिस्टर खालिद अल-फलीह म्हणाले की, ओपेक देश आणि त्याचे पार्टनर या गोष्टीवर सहमत आहेत की, टेक्निकल एनालिसिस पाहिल्यानंतर ते या निर्णायावर आले आहेत.

 

मोदी सरकारला लागला झटका

मागच्या एका महिन्यात कच्च्या तेलाच्या किमतीत 20 टक्क्यांनी घट झाली आहे. याचा फायदा भारताला पण मिळाला, त्यामुळे देशात पेट्रोल 7 रूपयांनी स्वस्त झाले. ही मोदी सरकार आणि नागरिकांसाठी आनंदाची बातमी होती. पण आता सौदी अरबच्या या घोषणेनंतर परत पेट्रोलचे भाव वाढण्यची शक्यता आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...