आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्यू लाँच : वीजेवर चालणारी नवी पॉवरफुल स्कूटर, एक रुपयांत धावेल 12KM पर्यंत, 55KM आहे टॉप स्पीड

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अॅटो डेस्क - इलेक्ट्रिक टू-व्हीलर तयार करणारी कंपनी ओकिनावा (Okinawa)ने फेस्टीव्ह सिझनमध्ये नवीन स्कूटर Ridge+ लाँच केली आहे. या स्कूटरची दिल्ली एक्स-शोरूम प्राइज 64,988 रुपये आहे. इलेक्ट्रीक स्कूटर बनवणारी ही देशातील पहिली कंपनी आहे. यापूर्वी कंपनीने डिसेंबर 2017 मध्ये प्रेज (Praise) लॉन्च केली होती. 


Ridge+ मध्ये कंपनीने 800 वॅटची रिचार्जेबल लिथियम इऑन बॅटरी दिली आहे. ही बॅटरी 3 तासांत पूर्ण चार्ज होते. चार्ज करण्यासाठी फक्त सुमारे 10 रुपये (6 रुपये प्रती युनिटनुसार ) ची वीज खर्च होते. त्यानंतर स्कूटर 120KM पर्यंत धावू शकते. म्हणजे स्कूटर 1 रुपयाच्या वीजेमध्ये 12 किलोमीटरचे मायलेज देईल. यात वॉटर-प्रूफ BLDC मोटर आहे. स्कूटर ऑरेंज-मॅग्ना ग्रे आणि मिड नाइट ब्लू रंगात उपलब्ध असेल. 

 

एकदा चार्ज केल्यानंतर स्कूटर 120 किलोमीटरपर्यंत धावेल असा कंपनीचा दावा आहे. स्कूटरची टॉप स्पीड ताशी 55 किमी आहे. कंपनीच्या मते या स्कूटरची लोडींग कॅपेसिटी 150 किलो आहे. शहरी भाग डोळ्यासमोर ठेवून ही स्कूटर डिझाइन केली आहे. 


ओकिनावा Ridge+ चे हायटेक फिचर्स 
> यात कारप्रमाणे सेंट्रल लॉकिंग सिस्टीम गिली आहे. 
> किल्लीच्या मदतीने स्कूटर लॉक करता येते. 
> चोरी टाळण्यासाठी अँटी थीप अलार्मही देण्यात आला आहे. 
> स्कूटर विना चावीचीही सुरू करता येते. 
> फ्रंट आणि रियर व्हीलमध्ये ड्रम ब्रेक E-ABS सह दिलेले आहेत. 
> जर कधी स्कूटर हरवलीतर ती रिमोटच्या मदतीने शोधता येईल. 
> अलॉय व्हील, ट्यूबलेस टायर आणि  टेलेस्कोपिक सस्पेंशन दिले आहेत. 

 

बातम्या आणखी आहेत...