आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रवाशांनीच लुटले OLA ड्रायव्हरला, नंतर पत्नीला व्हिडीओ कॉल करण्यास सांगून कपडे उतरवले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळुरू - बंगळुरू येथील अडुगोडी-डोम्मासांड्रा दरम्यान ओला कंपनीच्या एका कॅब ड्रायव्हर चार प्रवाशांनी लुटले. ड्रॉप लोकेशनवरून 100 किमी दूर गेल्यानंतर ड्रायव्हरला मारहाण करत त्याच्याकडून पैसे घेतले आणि पत्नीला व्हिडीओ कॉल करण्यास सांगितले. व्हिडीओ कॉल दरम्यान त्याच्या पत्नीचे कपडे उतरवून तिचे स्क्रीनशॉट घेतले. फिर्यादीने दिलेल्या फिर्यादीवरून चार अज्ञातांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


> ओला ड्रायव्हर सोमा शेखरला अडुगोडी ते डोम्मासांड्रा येथे जाण्याची बुकिंग मिळाली होती. त्याप्रमाणे तो रात्री साडे दहा वाजता प्रवाशांना घेऊन निघाला होता. ड्रॉप लोकेशनवर पोहोचल्यानंतर प्रवाशांनी थोडे पुढे सोडण्यास सांगितले त्यांच्या म्हणण्याप्रमाणे सोमाने गाडी पुढे नेण्यास सुरूवात केली. पुढे थोड्या अंतरावर गेल्यावर प्रवाशांनी सोमाला मारहाण करण्यास सुरूवात केली आणि गाडीची चावी हिसकावून स्वतः ड्रायव्हिंग सीटवर बसले.  
 
> 100 किमी दूर गेल्यावर त्या चार तरूणांनी पीडिताकडे पैशाची मागणी केली. सोमाने अकाउंटमध्ये असलेले 9000 रूपये त्यांनी दिले. पण एवढ्यावरच न थांबता त्यांनी पीडिताला त्याच्या पत्नीसोबत व्हिडीओ कॉल करण्यास सांगितले. सोमाने पोलिसांना सांगितले की, व्हिडीओ कॉल दरम्यान आरोपींनी त्याच्या पत्नीचे कपडे उतरविले आणि स्क्रीनशॉट घेतले. ते सेव्ह करून फोन हिसकावून घेतला.

 

> त्यानंतर आरोपींनी सोमाला रामानागरा जिल्ह्यातील चन्नापटना येथील लॉजमध्ये घेऊन गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी सोमा त्यांच्या तावडीतून पळून जाण्यात यश मिळवले आणि तात्काळ पोलिस ठाणे गाठून घडलेल्या घटनेची तक्रार नोंदवली. ओला ड्रायव्हरने दिलेल्या फिर्यादीवरून चार अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस आरोपींचा शोध घेत आहे. 

बातम्या आणखी आहेत...