आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जुन्या, नव्या नोकरांनी कट रचला; मालकाला तीन लाखांना लुटले 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद : व्यवसायाचा सगळा हिशेब सांभाळणाऱ्या नाेकराने पूर्वीच्या नोकरासोबत हातमिळवणी करून मालकावर चाकूचा वार करत ३ लाख रुपये लुटले. १४ ऑगस्ट रोजी रात्री ९.३० वाजता ही घटना घडली. पुंडलिकनगर पोलिसांनी बारा तासांत गुन्ह्याची उकल करत पाच जणांना अटक केली. पंकज लोटन पाटील (२१), प्रेम ऊर्फ निखिल अशोक साळवे (२०), कृष्णा ऊर्फ किशोर उत्तमराव लोखंडे (२५, तिघेही रा. कैलासनगर) आणि अरविंद सुभाष सपाटे (२८, रा. एन-६), योगेश देशमुख (३२, रा. मूळ माजलगाव) अशी आरोपींची नावे आहेत. 
 
कृष्णा हरजित चावरिया (१९, रा. पिसादेवी रोड) यांचे एन-४ व बीड बायपासवरच शिवशक्ती सिरॅमिक टाइल्सचे दालन आहे. १४ ऑगस्टला रात्री कृष्णा दुकान बंद करून कारने एकटे घरी निघाले. ९.४५ वाजेच्या सुमारास हनुमान चौकात मॅक्सिम बँकेच्या एटीएमसमोर दुचाकीवर आलेल्यांनी त्यांच्या कारला धडक देऊन अपघाताचे नाटक केले. दुचाकी दुरुस्त करून द्या, अशी मागणी केली. घाबरलेल्या कृष्णा यांनी होकार दिला. आरोपींनी त्यांना कामगार चौकात ओळखीच्या गॅरेज चालकाकडे जाऊ, असे सांगत दुचाकीवरील एक जण कारमध्ये बसला व कृष्णा यांना हायकोर्ट परिसरातील निर्मनुष्य ठिकाणी नेले. कारमध्ये बसलेल्याने मागून चाकू लावत बीटवरील तीन लाख रुपये ठेवलेली बॅग घेत कृष्णाच्या डाव्या बरगडीत चाकूने वार करत दुचाकीवर बसून निघून गेला. सहायक पोलिस निरीक्षक घनश्याम सोनवणे, उपनिरीक्षक विकास खटके, विनायक कापसे, जमादार रमेश सांगळे, मच्छिंद्र शेळके, बाळाराम चौरे, प्रवीण मुळे, जालिंदर मांटे, शिवाजी गायकवाड, राजेश यदमळ, नितेश जाधव, दीपक जाधव, गणेश डोईफोडे आणि माया उगले यांनी आरोपींचा शोध घेत चौघांना अटक केली. एक लाख ७९ हजार रुपयांची रोख, चाकू, दोन दुचाकी, चार मोबाइल असा ऐवज जप्त केला. उपायुक्त डॉ. राहुल खाडे, एसीपी रामचंद्र गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई झाली. 
कारमध्ये निर्मनुष्य ठिकाणी नेत दाखवला चाकूचा धाक 
अवघ्या बारा तासांत पाच आरोपींना जेरबंद केलेल्या आरोपींसह पोलिस अधिकारी व कर्मचारी. 
 
अशी केली घटनेची उकल 
लुटण्याच्या घटनेनंतर पोलिसांनी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. कृष्णा घाबरलेल्या अवस्थेत असल्याने ते सांगू शकत नव्हते. सहायक पोलिस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी कृष्णा यांना बाहेर नेत मोकळेपणाने बोलण्यास सुरुवात केली. बुधवारी दिवसभर नेमके काय झाले याची चौकशी केली. त्यात योगेशने सायंकाळी पैशांविषयी विचारल्याचे कृष्णा यांनी सांगितले. तेथेच संशय आला. त्यानंतर सोनवणे यांनी दुकानातील नऊ कर्मचाऱ्यांची चौकशी केली. त्यात चार महिन्यांपूर्वी एकाने काम सोडल्याचे समोर येताच पंकजच्या घरी संपर्क साधला. तो बुधवारी रात्रीच गावाला गेल्याचे कळाले. त्यानंतर आधी पंकजला व नंतर इतर तिघांना ताब्यात घेतले. 
 
जाब विचारणाराच निघाला आरोपी : गावाकडे जाताना मुसक्या आवळल्या 
योगेशने पंकजला माहिती दिल्याने त्याला कटाची माहिती होती. कृष्णा यांना तुटल्यानंतर योगेश खाऊन आला. दुसऱ्या दिवशी कृष्णा सोबत पोलिस चौकशी करत असताना योगेश मात्र पोलिसांनाच प्रश्न विचारत होता. alt147तुम्ही उशीर का करताय, गुन्हा दाखल करा, आरोपींना कधी पकडणार' असे प्रश्न विचारत होता. गुरुवारी सायंकाळपर्यंत त्याचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले होते. रात्री तो देखील गावाकडे निघाला होता. परंतु त्यापूर्वीच पाचोड जवळ पोलिसांनी त्याला पकडले. 
 
चौघे आरोपी नामांकित कॉलेजातले 
पंकजने ४ महिन्यांपूर्वीच कृष्णा यांच्याकडील नोकरी सोडली होती. तेव्हापासून तो कायम योगेश च्या संपर्कात होता. १४ ऑगस्टला सायंकाळी ६.३० वाजता योगेशने मालकाला पैसे मोजताना पाहिले. तेव्हा त्याने सर, ही रक्कम आज घरी घेऊन जाणार का, असे विचारले होते. योगेश सर्व आर्थिक व्यवहार पाहत असल्याने विश्वासू होता. योगेशने तत्काळ पंकजला याबाबत सांगितले होते. पंकजने इतर तिघांना सांगून दोन मित्रांच्या दुचाकी आणल्या. अपघाताचा बनाव करुन तुटेपर्यंत पंकज लांब उभा होता. घटनेच्या आधी चौघांनी जळगाव रस्त्यावर मद्यप्राशन केले होते. योजना यशस्वी झाल्याने चौघांनी जालन्यात जाऊन पार्टी केली. आरोपींपैकी चौघेही नामांकित महाविद्यालयातील विद्यार्थी आहेत. पंकज बी.एस्सीचा, कृष्णा एम.ए. इतिहासाचा विद्यार्थी आहे. 
 

बातम्या आणखी आहेत...