आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सशस्त्र दरोडेखोरांशी दोन हात करताना वयोवृद्ध दांपत्याचा व्हिडिओ व्हायरल, असे पळवून लावले

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चेन्नई(तमिळनाडू)- येथील एका वृद्ध दाम्पत्याने शस्त्र घेऊन आलेल्या चोरांचा मोठ्या हिमतीने सामना करुन हकलून लावले. या वृद्ध दाम्पत्याच्या साहसाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. प्रकरण दक्षिण तमिळनाडुच्या तिरुनेलवेली जिल्ह्यातील आहे. चोरांसोबत सामना करतानाचा वृद्ध दाम्पत्याचा व्हिडिओ त्यांच्या फार्म हाउसवर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे.
 
घटना रविवारी रात्री 9 वाजताची आहे. 70 वर्षीय शानमुगवेल फार्महाउसच्या बाहेर वरांड्यात बसले होते. तेव्हा मागून एक चोर आला आणि टॉवेलने त्यांचा गळा दाबण्याचा प्रयत्न करु लागला. स्वतःला वाचवण्यासाठी शनमुगवेल खूप प्रयत्न केले, तेव्हा दुसरा एक चोर आला. ते दोघे शनमुगवेल मारहाण करू लागतेत. या दरम्यान शनमुगवेल यांचा आवाज ऐकून त्यांची पत्नी बाहेर आली. पत्नीने चप्पलने चोरांना मारणे सुरू केले आणि शानमुगवेल यांनी खुर्चीच्या साहाय्याने चोरांवर हल्ला चढवला. शेवटी त्या दोघांच्या हिमतीपुढे चोरांना हार स्विकारुन पळून जावे लागले. सध्या पोलिस व्हि़डिओच्या आधारे चोरट्यांचा शोध घेत आहेत.