आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विराट चांगला मॅच्युअर झाला; धाेनी करताेय टीमला गाइड; टीम इंडियाविषयी वर्ल्डकप खेळलेल्या क्रिकेटपटूंचे मत

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - विश्वचषकातील भारताच्या सामन्याला अद्याप दाेन दिवस उरले आहेत. नुकतेच क्रिकेटचे रायटर विजय लाेकपल्ली यांनी ‘वर्ल्डकप वाॅरियर्स’ नावाचे पुस्तक लिहले आहे. यामध्ये त्यांनी माजी क्रिकेटपटूंची आताच्या भारतीय संघातील खेळाडूंबद्दलची मते मांडली आहेत. यामध्ये १९८३ च्या विश्वचषक विजेत्या भारतीय संघातील माजी खेळाडूंचा समावेश आहे. कपिलदेवच्या मते विराट काेहली हा चांगल्या प्रकारे मॅच्युअर झाला, तर किरण माेरे म्हणतात धाेनी टीमला गाइड करताे. 

 

विराटविषयी कपिल देव:  याची खेळण्याची शैलीच आक्रमक आहे...

विश्वचषकासारख्या माेठ्या स्पर्धेत टीमला लीड करण्यासाठी काेहली हा सर्वात महत्त्वाचा पर्याय आहे. धाेनीकडून त्याच्याकडे नेतृत्वाची सूत्रे आली. त्यानंतर ताे चांगल्या प्रकारे मॅच्युअर झाला. त्याच्या  आक्रमक स्वभावाची चर्चा हाेत असे. त्याने यात  सुधारणा केली. ताे सहकाऱ्यांचीही मते लक्षात घेताे.  या शांत स्वभावातून ताे कुशलपणे संघाचे नेतृत्व करत आहे, अशी प्रतिक्रिया कपिलदेव यांनी दिली. 

 

इतर खेळाडूंविषयी जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइड पाहा....

बातम्या आणखी आहेत...