आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारावेर- टक्केवारी घेऊन जुन्या नोटा बदलून नव्या नाेटा देणाऱ्या आंतरराज्यीय रॅकेटचा पर्दाफाश करण्यात मध्य प्रदेशातील इंदूर पोलिसांना गुरुवारी रात्री यश आले आहे. या प्रकरणाचे धागेदोरे थेट औरंगाबाद, भुसावळ, बोदवड आणि रावेर या महाराष्ट्रातील शहरांपर्यंत असल्याचे समाेर अाले अाहे. रावेर पाेलिसांच्या टिपवरून इंदूरमध्ये झालेल्या या कारवाईत तीन जणांना अटक करण्यात अाली. त्यांच्या ताब्यातून १ कोटी ५ लाखांच्या बाद नाेटा जप्त करण्यात अाल्या.
सुरत येथील रहिवासी शेख साजिद शेख रहीम याने १६ ऑगस्ट राेजी रावेर (जि. जळगाव) पोलिस ठाणे गाठून त्याचा सहकारी सय्यद शोएब याचे अपहरण झाल्याची फिर्याद दिली हाेती. साजिद व शोएब याने ११ ऑगस्टला औरंगाबाद येथून ११ लाख रुपये देऊन त्या बदल्यात १ कोटी ५ लाख रुपयांच्या चलनातून बाद झालेल्या नोटा घेतल्या हाेत्या. त्या नोटा सुरतमधील चौघांना पोहोचवल्यावर त्यांना २५ लाख रुपये मिळणार होते. यासाठी ते जुन्या नोटा घेऊन रावेरमार्गे गुजरातला निघाले होते. भुसावळ येथील बांधकाम क्षेत्रात कार्यरत व व्यवसायाने एमआर असलेली शेख इम्रान नावाची व्यक्ती त्यांच्या संपर्कात होती, तर मूळ रावेरातील मात्र अहमदाबाद येथे आयुर्वेद उपचार करणारी हबीब खान (हबीबबाबा) नावाने परिचित व्यक्ती इम्रानच्या संपर्कात होती. या सर्वांचा मध्यस्थ म्हणून बोदवड येथील कलीम शेख काम करत होता.
दरम्यान, शेख इम्रानच्या सूचनेनुसार ११ ऑगस्टला साजिद व शोएब हे औरंगाबाद येथून १ कोटी ५ लाख रुपयांच्या बाद नोटा घेऊन रात्री ११.३० वाजता रावेरजवळील बालाजी टन काट्याजवळ आले. काही वेळाने शेख इम्रान व हबीबबाबा नामक दोघे कारमधून तिथे आले. त्यांनी सय्यद शोएबला बळजबरीने कारमध्ये कोंबून मध्य प्रदेशच्या दिशेने धूम ठोकली. पाच दिवस शोएबसोबत कोणताही संपर्क न झाल्याने साजिद याने १६ ऑगस्टला रात्री १२ वाजता रावेर पोलिसात तक्रार देऊन संपूर्ण वृत्तांत कथन केला. त्यावरून पाेलिसांनी तपासचक्र फिरवले. बऱ्हाणपूर पोलिसांतही संपर्क साधला. दरम्यान, या माहितीवरून इंदूर पाेलिसांनी गुरुवारी रात्री छापा टाकून हबीबबाबा (रा.रावेर), शेख इम्रान (रा. भुसावळ) आणि शोएब (रा.सुरत) या तिघांना १ कोटी ५ लाखांच्या बाद झालेल्या नोटांसह अटक केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.