प्रत्येकाने विचार केला पाहिजे की, त्याने बनवलेल्या परंपरेचे पालन पुढील पिढी करते
दिव्य मराठी वेब टीम
Apr 15,2019 04:11:00 PM ISTरिलीजन डेस्क- पुरातन कथेनुसार एका गावात एक मोठे कुटुंब राहत होते. कुटुंबात एका वृद्धाला चार मुले होती. चारही मुलांचे लग्न झाले होते आणि ते आपल्या पत्नींसोबत एकत्र राहत होते. त्यांच्यात मोठ्या मुलाला एक मुलगा होता. त्या चार मुलांचे वडील खूप आजारी पडले होते. त्यांच्या आजारात खूप खर्च होत होता, आणि त्याच्या सुनेंना खूप काळजी घ्यावी लागत होती. सगळ्यांनी आपल्या पतींना सांगितले की, वडिलांना गोठ्यात ठेवा, त्यांच्यामुळे घरात खूप त्रास होत आहे.
> चारही भावांनी आपल्या पत्नींच्या हो मध्ये हो मिळवली आणि त्यांनी वडिलांना घराबाहेरील गोठ्यात ठेवले. वडिलांना त्यांनी एक तांब्या दिला आणि म्हणाले की, जेव्हाकधी भुक लागेल तेव्हा तांब्या वाजवा, आम्ही जेवण आणुन देत जाऊ.
> लाचार झालेले वडील काहीच बोलू शकले नाही आणि त्यांनी गोठ्यात राहणे सुरू केले. तेव्हा त्यांना भुक लागायची, ते तांब्या वाजवत होते आणि घरातून कोणीतरी येऊन त्यांना सुकलेल्या पोळ्या आणि शिळे अन्न देत होते. असे अनेक दिवस सुरू होते, आणि हे सगळं घरातील एक छोटा मुलगा पाहत होता. एके दिवशी त्याने आजोबांकडे जाऊन सगळं काही विचारल.
> त्यांनी आपल्या नातवालास सगळं काही सांगितले, तेव्हा नातवाने पाहीले की, त्यांच्या पलंगाजवळ तुटलेली मातीची भांडी पडली आहेत. त्याने ते भांडे उचलले आणि घरात नेऊन ठेवले. मुलाच्या वडिलांनी पाहीले आणि विचारले हे सगळं काय आणल आहेस?
> तेव्हा तो म्हणाला की, बाबा जेव्हा तुम्हील म्हातारे व्हाल तेव्हा तुम्हालाही गोठ्यात राहावं लागेल, त्यावेळेस तुम्हाला देण्यासाठी भांडे जमा करत आहे. ते ऐकून सगळ्या भावांना आपली चुक कळाली.
> त्यानंतर त्यांनी वडलिलांना घरात आणले आणि आनंदाने राहू लागले.
कथेची शिकवण
आपण जे करतो त्याचे अनुकरण आपली येणारी पिढी करत असते. त्यामुळे मुलांना चांगले शिकवावे.