Home | Maharashtra | Marathwada | Other Marathwada | Old man died in Plice beating in Umarga village

पोलिसांच्या मारहाणीत उमरग्यातील वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू, नागरिकांनी मृतदेहासह पोलिस ठाण्यात मांडला ठिय्या...

दिव्य मराठी वेब टीम | Update - Apr 25, 2019, 12:33 PM IST

दगडफेक करणाऱ्या युवकांना पकडण्यासाठी पोलिस गेले होते

  • Old man died in Plice beating in Umarga village

    उस्मनाबाद- उस्मनाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील तलमोडमध्ये पोलिसांनी केलेल्या मारहाणीत वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. यानंतर शेकडो गावकऱ्यांनी पोलिसांच्या मारहाणीत मरण पावलेले दत्तू मोरे(70) यांचे पार्थिव घेऊन थेट पोलिस ठाण्यातच ठिय्या मांडला.

    उमरगा तालुक्यातील तलमोड येथील कराळीमध्ये मागील रविवारी चारकाची गाडीचे पुढचे टायर फुटून गॅसचा स्फोट झाला होता, त्या स्फोटात तिघांचा जळून मृत्यू झाला होता. यावेळी गावातील काही तरुणांनी पोलिसांच्या गाडीवर दगडफेक करत अग्निशामक दलाची गाडी पलटली होती.

    याप्रकणी पोलिसांनी गुन्ह्यांची नोंद करून आरोपी तरुणांच्या तपासासाठी एक पथक बुधवारी रात्री तलमोडला पाठवले होते. या कारवाईत पोलिसांनी दहा ते बारा तरूणांना पकडलं, यावेळी झालेल्या झटापटीत पोलिसांनी दत्तू मोरे यांना जबर मारहाणी केली आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. यावेळी पोलिसांनी गावकऱ्यांच्या घराचे दरवाजेही तोडले.

    या सर्व प्रकरणामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिस ठाण्यात गावातील शेकडो लोकांनी ठिय्या मांडला आहे. दरम्यान, कोणत्याच निष्पाप व्यक्तीवर कारवाई केली जाणार नाही आणि या प्रकणाची सखोल चौकशी करून आरोपिंविरूद्ध कडक कारवाई केली जाईल अशी माहिती पोलिस अधिक्षक आर. राजा यांनी दिली.

Trending