Home | International | Other Country | Old tattoo tradition in Bangkok

बँॅकॉकमध्ये भाग्य बदलण्यासाठी गरम सळईने टॅटू गोंदवण्याची वार्षिक परंपरा

दिव्य मराठी वेब टीम | Update - Mar 17, 2019, 12:47 PM IST

सापाच्या विषापासून तयार करण्यात आलेल्या शाईने गोंदला जातो टॅटू

  • Old tattoo tradition in Bangkok

    बँकॉक- थायलंडच्या राजधानीपासून जवळच असलेल्या वाट बँग फ्रा बौद्ध मंदिरात शनिवारी टॅटू उत्सव साजरा झाला. हा वार्षिक उत्सव असतो. त्यात देश-विदेशातील १० हजारांहून जास्त लोक सहभागी होतात. भिक्खू मंत्रोच्चारण करतात. त्यादरम्यान टॅटू गोंदवला जातो. असे केल्यास भाग्य बदलते, अशी श्रद्धा आहे. त्यासाठी तप्त सळईचा वापर होतो. ही प्रक्रिया प्रचंड वेदनादायी असते. त्यामुळे किंचाळण्याचे आवाज येतात. उपस्थित लोक घाबरतात. संकोचतात. नातेवाईक आढेवेढे घेणाऱ्यांना भिक्खूंपर्यंत आेढून नेतात. टॅटू टोकदार सळईने तसेच सापाच्या विषापासून तयार करण्यात आलेल्या शाईने गोंदला जातो.


    दरवर्षी रिचार्ज होतो..
    मंदिरात आलेले भाविक चलाचाई पिचुआ म्हणाले, वाघ, चित्ता, विंचू इत्यादी प्राण्यांच्या आकाराचे टॅटू गोंदवले जातात. दरवर्षी मी येथे येतो. येथे आल्यावर रिचार्ज झाल्याची भावना आहे. जगात सर्वाधिक प्रमाणात टॅटू गोंदवण्याची परंपरा थायलंडमध्ये आहे. अभिनेत्री अँजेलिना जोलीनेदेखील २००४ मध्ये थाई परंपरेनुसार टॅटू गोंदवला होता.


Trending