आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पूजेमध्ये तुपाचा दिवा आपल्या डाव्या बाजूला लावावा आणि तेलाचा दिवा उजव्या बाजूला ठेवावा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

देवी-देवतांच्या पुजेमध्ये दिव्याला विशेष महत्त्व असते. ज्या लोकांना विधिव्रत पूजा करणे शक्य नाही ते लोक देवासमोर एक दिवा लावून पुजा करू शकतात. दिव्याने आरती केली जाते. आरती केल्यानंतरच पुजा संपन्न होते. आरतीचे महत्त्व लक्षात घेऊन दिवा तयार करताना काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी. ऊज्जैन येथील ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मानुसार जाणून घ्या दिव्यासंबंधी काही खास नियम


दिवा लावताना करा या मंत्राचा उच्चार 
शुभम् करोति कल्याणं, आरोग्यं धन संपदाम्।
शत्रुबुद्धि विनाशाय, दीपं ज्योति नमोस्तुते।।


दिव्याला नमस्कार करून या मंत्राचा जप केल्याने घरामध्ये सर्वकाही शुभ घडते, सर्वांचे कल्याण होते, चांगले आरोग्य मिळते, धन-संपत्ती वाढते, शत्रूंच्या बुद्धीचा विनाश होतो.


# येथे जाणून घ्या, दिव्याशी संबधित 5 खास गोष्टी... 
> पूजेमध्ये तुपाचा दिवा आपल्या डाव्या हाताकडे आणि तेलाचा दिवा उजव्या हाताकडे लावावा.


> पूजा करताना दिवा विझणार नाही याकडे विशेष लक्ष द्यावे. दिव्या विझल्यास पूजेचे पूर्ण फळ मिळत नाही.


> तुपाच्या दिव्यासाठी पांढऱ्या रुईच्या वातीचा उपयोग करावा. याउलट तेलाच्या दिव्यासाठी लाल दोऱ्याच्या वातीचा उपयोग करावा.


>पूजेमध्ये कधीही खंडित दिवा वापरू नये. धार्मिक कार्यामध्ये खंडित सामग्री शुभ मानली जात नाही.

बातम्या आणखी आहेत...