आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नॉलेज : अंत्ययात्रेवरून परतल्यानंतर स्नान न केल्यास काय नुकसान होऊ शकते?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर अंत्ययात्रा काढली जाते आणि स्मशानात त्यावर अंत्यसंस्कार केले जातात. मान्यतेनुसार एखाद्या व्यक्तीच्या अंत्ययात्रेमध्ये सहभागी झाल्याने पुण्य वाढते आणि शरीर पवित्र करण्यासाठी अंत्यसंस्कारानंतर घरी परत आल्यानंतर स्नान करावे. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार जाणून घ्या, अंत्यसंस्कार केल्यानंतर स्नान करणे आवश्यक का आहे...


आरोग्यासाठी आवश्यक आहे स्नान करणे 
> अंत्यसंस्कारानंतर घरी आल्यानंतर स्नान करणे आवश्यक आहे. अंत्ययात्रेमध्ये सहभागी होणे पुण्य कर्म आहे परंतु स्मशानात गेल्यामुळे आपले शरीर अशुद्ध होते. शरीराच्या शुद्धीसाठी स्मशानातून परत आल्यानंतर स्नान करावे.


> स्मशानातील वातावरणात जळणाऱ्या शवामुळे उग्र दुर्गंध पसरतो आणि विविध प्रकारचे न दिसणारे सूक्ष किटाणू सर्वात पसरतात. हे किटाणू स्मशानातील उपस्थित लोकांच्या कपड्यांवर आणि केसांवर चिटकतात.


> स्मशानातून परत आल्यानंतर स्नान न केल्यास किटाणू आपल्या शरीराला नुकसान पोहोचवू शकतात. कोणत्याही प्रकारच्या संसर्गापासून बचाव होण्यासाठी स्मशानातून घरी आल्यानंतर सर्वात पहिले स्नान करण्याची प्रथा प्रचलित आहे.


स्मशानातून आल्यानंतर स्नान न करता पूजा-पाठ करू नये
> एखादा व्यक्ती अंत्ययात्रेमध्ये सहभागी झाला असेल तर तो घरी आल्यानंतर स्नान न करता कोणताही पूजा-पाठ करू शकत नाही.


> पूजा-पाठ आणि एखाद्या मंदिरात जाण्यासाठी शरीर शुद्ध असणे आवश्यक आहे. या कारणांमुळेही अंत्ययात्रेवरून परत आल्यानंतर स्नान करणे आवश्यक आहे.

 

बातम्या आणखी आहेत...