आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरामध्ये पॉझिटिव्ह ऊर्जा कायम ठेवण्यासाठी नियमितपणे करत राहावेत हे काम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

घरामध्ये सुख-समृद्धी आणि पॉझिटिव्हिटी कायम ठेवण्यासाठी विविध प्रथा प्रचलित आहेत. प्राचीन मान्यतांमध्ये सांगण्यात आलेले शुभ काम नियमितपणे करत राहिल्या कोणत्याही स्त्री-पुरुषाचे भाग्य बदलू शकते. येथे जाणून घ्या, कोलकाताच्या एस्ट्रोलॉजर डॉ. दीक्षा राठी यांच्यानुसार वास्तू आणि ज्योतिषचे असे 12 काम ज्यामुळे शुभफळ प्राप्त होऊ शकतात...


1. घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी घरामध्ये दररोज धूप-दीप द्यावी. धूप विविध औषधी वनस्पतींपासून तयार केली जाते. यामधून निघणाऱ्या धुरामुळे नकारात्मकता आणि वातावरणातील हानिकारक किटाणू नष्ट होतात.


2. घरामध्ये विंड चाइम्स लावाव्यात. याच्या आवाजाने घरातील नकारात्मकता नष्ट होते आणि वास्तुदोष दूर होतात.


3. तुम्हाला कुबेरदेवाची कृपा प्राप्त करण्याची इच्छा असल्यास घराच्या उत्तर दिशेला कुबेराचा फोटो लावावा आणि रोज याची पूजा करावी. या ठिकाणी कधीही अस्वच्छता राहणार नाही याकडे विशेष लक्ष द्यावे.


4. घरामध्ये मनीप्लँट लावावा. रोज याची निगा राखावी. या झाडाची पाने पिवळे पडले किंवा सुकून गेले तर ते लगेच काढून टाकावेत.


5. नियमितपणे उगवत्या सूर्याला तांब्याच्या कलशाने जल अर्पण करावे. जल अर्पण करताना सूर्य मंत्र 'ऊँ आद‌ित्याय नमः' मंत्राचा जप करावा.


6. रोज घराबाहेर पडण्यापूर्वी आपल्या कुलदेवतेचे पूजन करावे. वेळ कमी असल्यास धूप-दीप दाखवून नमस्कार करावा आणि कृपा प्राप्तीसाठी प्रार्थना करावी.


पुढील स्लाईड्सवर वाचा, असेच इतर काही खास उपाय...

बातम्या आणखी आहेत...