आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देवघराशी संबंधित 7 गोष्टींकडे लक्ष दिल्यास पूजा लवकर फलदायी होऊ शकते

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बहुतांश घरांमध्ये देवी-देवतांसाठी एक वेगळी खोली किंवा देवघर बनवलेले असते. नियमितपणे देवघरात पूजा केल्यास शुभफळ प्राप्त होतात. वातावरण पवित्र राहते. घरामध्ये शांतता राहते. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार येथे जाणून घ्या, अशा काही गोष्टी ज्या देवघरात अवश्य लक्षात ठेवाव्यात.


- पूजा करणाऱ्या व्यक्तीचे मुख पश्चिम दिशेला असणे अत्यंत शुभ राहते. यासाठी देवघराचे मुख पूर्व दिशेला असणे आवश्यक आहे.


- हे शक्य नसल्यास पूजा करताना व्यक्तीचे मुख पूर्व दिशेला असल्यासही श्रेष्ठ फळ प्राप्त होऊ शकतात.


- देवघर अशा ठिकाणी असावे जेथे दिवसातून काहीवेळ तरी सूर्यप्रकाश पोहोचेल.


- ज्या घरांमध्ये सूर्यप्रकाश आणि ताजी हवा येत राहते त्या घरातील विविध दोष आपोआप नष्ट होतात. सूर्यप्रकाशामुळे वातावरणातील नकारत्मक ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते.


- देवघर असलेल्या खोलीमध्ये चामड्यापासून बनवलेल्या वस्तू, चप्पल-बूट घेऊन जाऊ नये. देवघरात मूर्त व्यक्ती आणि पूर्वजांचे फोटोही लावू नयेत.


- पूर्वजांचे फोटो लावण्यासाठी दक्षिण दिशा उत्तम राहते. घरामध्ये दक्षिण दिशेच्या भिंतीवर मृतकांचे फोटो लावले जाऊ शकतात परंतु देवघरात लावू नयेत.


- देवघरात फक्त पुजेशी संबंधित सामग्री ठेवावी. इतर कोणत्याही वस्तू ठेवू नयेत.

बातम्या आणखी आहेत...