Home | Jeevan Mantra | Dharm | old traditions about temple in home, parampara

देवघरात ठेवू नये मोठमोठ्या मूर्ती, झोपण्यापूर्वी देवघरावर टाकावा पडदा; जाणून घ्या कारण

दिव्य मराठी वेब टीम | Update - May 09, 2019, 02:15 PM IST

देवघर शोचालयाजवळ असू नये. अशा ठिकाणी देवघर ठेवल्यामुळे वास्तूदोष वाढतो

 • old traditions about temple in home, parampara

  रिजनल डेस्क - घरात मंदिर बनवण्याची परंपरा अनेक वर्षांपासून चालत आली आहे. अशी मान्यता आहे की, मंदिरामुळे घरात सकारात्मकता राहते. म्हणून काळजी घेतली पाहिजे की, मंदिराजवळ घाण असू नये. नियमितपणे सकाळी आणि सायंकाळी पुजा केली पाहिजे. उज्जैन येथील ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मानुसार जाणून घ्या घरातील मंदिराबाबत काही वैशिष्ट्ये...


  देवघरात मोठमोठ्या मूर्ती ठेवू नये. शिवपुराणनुसार देवघरात आपल्या अंगठ्यापेक्षा मोठा शिवलिंग ठेवू नये. शिवलिंग खूप संवेदनशील असतो म्हणून देवघरात लहान आकाराचा शिवलिंग ठेवावा. इतर देवी-देवीतांच्या मूर्तीही लहान आकाराच्या असाव्यात.

  लक्षात ठेवा देवघरात तुडलेल्या मूर्ती ठेवू नयेत. तुटलेल्या मूर्तींना लगेच बाजूला काढून टाकावे. तुटलेल्या मूर्ती पुजेसाठी अशुभ मानल्या जातात, पण शिवलिंग कधीच कोणत्याही अवस्थेमध्ये तुटलेले मानले जात नाही. इतर देवी-देवतांच्या तुटलेल्या मूर्ती देवघरात ठेवू नये.

  रात्री झोपण्यापुर्वी देवघरावर पडदा टाकावा. जसे आपण झोपेत असताना कोणताही अडथळा आवडत नाही, तसेच देवांच्या विश्रामात अडथळा येता कामा नये. पूजा करण्याऱ्या व्यक्तीचे तोंड पश्चिम दिशेने असल्यास शुभ मानले जाते. यासाठी देवघराचा दरवाजा पूर्व दिशेने असावा. जर हे शक्य नसेल तर व्यक्तीने पूर्व दिशेला तोंड करून पूजा करणे अधिक चांगले.

  देवघर शोचालयाजवळ असू नये. अशा ठिकाणी देवघर ठेवल्यामुळे वास्तूदोष वाढतो

  देवघर अशा ठिकाणी बनवले पाहिजे जेथे काही वेळेकरता सूर्यप्रकाश येत असेल. सूर्यप्रकाश आणि ताज्या हवेमुळे घरातील अनेक दोष नष्ट होतात. सूर्यप्रकाश वातावरणातील नकारात्मक ऊर्जेला नष्ट करते.

  सकाळी आणि सायंकाळी नियमित पूजा केली पाहिजे. देवघरात दिवा लावणे, पूजा करतेवेळी घंटी वाजवणे गरजेचे आहे. घंटीचा आवाज आणि दिव्याच्या प्रकाशाने नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. शुभ मुहूर्तावर देवघरात आणि संपूर्ण घरात गौमुत्र शिंपडावे. गोमुत्र शिंपडल्याने पवित्रता येते. पूजा करताना शिळे फूल, पान अर्पण करू नये. स्वच्छ आणि ताज्या पाण्याचा उपयोग करावा. लक्षात ठेवा तुळशीचे पान आणि गंगाजल कधीच शिळे मानले जात नाही. देवघराजवळ चमड्यापासून बनवलेले बुट, चप्पल घेऊन जाऊ नये.

Trending