आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्राचीन काळापासून विद्वान आणि वडीलधार्या मंडळींच्या पाया पडण्याची प्रथा सुरु आहे. या प्रथेकडे मान-सन्मान देण्याच्या दृष्टीने पाहिले जाते. हे तर सर्वांनाच माहिती आहे की वडीलधार्या मंडळींच्या पाया पडावे, परंतु हे फार कमी लोकांना महिती असावे की एखादा व्यक्ती आपल्या पाया पडल्यानंतर काय करावे.
कोणी आपल्या पाया पडले तर आपल्याला लागतो दोष
- पाया पडणे, नमस्कार करणे अत्यंत महत्त्वाची प्रथा आहे आणि आजही या प्रथेचे पालन केले जाते.
- या प्रथेसंबंधी विविध प्रकारचे नियम सांगण्यात आले आहेत. या प्रथेमागे धार्मिक आणि वैज्ञानिक दोन्ही कारणे सांगण्यात आले आहेत.
- कोणताही व्यक्ती मग तो पुरुष असो किंवा शत्रू तुमच्या पाया पडल्यानंतर त्याला आशीर्वाद द्यावा, तसेच देवाचे नाव घ्यावे.
- सामान्यतः आपला पाय कोणाला लागणार नाही याची आपण काळजी घेतो. असे घडल्यास आपल्याला दोष लागतो आणि जेव्हा एखाद्या व्यक्ती आपल्या पाया पडतो तेव्हाही आपल्याला दोष लागतो. या दोषापासून दूर राहण्यासाठी मनातल्या मनात देवाकडे क्षमा मागावी.
शास्त्रामध्ये लिहिण्यात आले आहे की...
अभिवादनशीलस्य नित्यं वृद्धोपसेविन:।
चत्वारि तस्य वर्धन्ते आयुर्विद्या यशो बलम्।।
अर्थ -
दररोज वडिलधार्यांची सेवा करणार्या आणि वंदन करण्याचा स्वभाव असणार्या नम्र माणसाचे आयुष्य, ज्ञान, कीर्ती आणि ताकद हे सतत वाढतच राहते.
कोणी तुमच्या पाया पडल्यानंतर काय करावे
कोणी तुमच्या पाया पडल्यानंतर देवाचे नाव घ्यावे. देवाचे नाव घेतल्याने पाया पडणाऱ्या व्यक्तीलाही सकारत्मक उर्जा प्राप्त होते आणि तुमच्या पुण्यामध्ये वाढ होते. आधीर्वाद दिल्याने पाय पडणाऱ्या व्यक्तीच्या सर्व अडचणी दूर होतात, आयुष्य वाढते आणि नकारात्मक शक्तींपासून त्याचे रक्षण होते. आपण केलेल्या शुभ कार्याचा प्रभाव, पाया पडणाऱ्या व्यक्तीवर पडतो.
आशीर्वादामध्ये चमत्कारिक प्रभाव असतो. जेव्हा आपण एखाद्याला मनातून आशीर्वाद देतो, तेव्हा निश्चितच त्याला शुभफळ प्राप्त होतात. एखाद्याबद्दल चांगला विचार केल्याने आपल्या पुण्यातही वाढ होते
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.