आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

OMG: कोट्यावधी रुपयांत विकले जात होते हे गो़डाऊन; अनेकांना पडला प्रश्न आत नेमके आहे तरी काय?

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ब्रिस्बेन - ऑस्ट्रेलियात एका जुन्या गोदामाच्या विक्रीसाठी ऑनलाइन जाहिरात आली आहे. यात गोदामाची किंमत तब्बल 9 कोटी रुपये सांगितली जात आहे. या ठिकाणावरून ये-जा करणाऱ्यांना अनेकांना प्रश्न पडला की साध्या गोदामाला इतकी किंमत का येत आहे. तसेच आत नेमके काय आहे? ज्याची कोट्यावधींमध्ये विक्री केली जात आहे. पण, जेव्हा गोडाउनचे आतील फोटो जारी झाले तेव्हा पाहणाऱ्या प्रत्येकाला धक्काच बसला. 
 

गोडाउनमध्ये होते आलीशान घर...
- ब्रिस्बेनमध्ये असलेल्या या गोडाउनमध्ये प्रत्यक्षात एक आलीशान घर आहे. यात मॉडर्न किचन, डायनिंग एरिआ आणि स्टालिश बाथरूमसह दोन बेडरुम आहेत. 
- गोदामाची विक्री करण्यासाठी दिलेल्या ऑनलाइन जाहिरातीनुसार, शहराच्या मध्यभागी प्रॉपर्टी शोधणाऱ्या असे इंस्डस्ट्रिअल स्टाइल वेयरहाउस दुसरे सापडणार नाही. 
- प्रॉपर्टीवर ओपन सीलिंग, काँक्रीट फ्लोर, स्टील बीम आणि मॉडर्न फीलसह स्टायलिश लुक देण्यात आला आहे. ओपन स्पेस असे ठेवण्यात आले की मालक त्याला आपल्या मर्जीनुसार बदलू शकतो. 
- जाहिरातीनुसार, घराबाहेर मोकळे कोर्टयाड आहे. येथे बसून गुलाबी उन्हाची मजा लुटता येईल. प्रॉपर्टीला दोन्ही बाजूंनी रोड आहे. सोबतच दोन पार्किंग स्पेस आहेत. 
- एजंट जॅक टुली यांनी सांगितल्याप्रमाणे, ही प्रॉपर्टी आतून पाहिल्यानंतर खरेदी करणाऱ्यांच्या रांगा लागल्या आहेत. यात प्रामुख्याने लोक या घरास पूर्णपणे वेअरहाऊसचे लुक देऊ इच्छित आहेत. 

बातम्या आणखी आहेत...