आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वयाच्या 70 व्या वर्षीही काम करतात 5 लाख वृद्ध, एका दशकात दुप्पटीने वाढली संख्या

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन(ब्रिटेन)- असे म्हणतात की कामाला कोणतीही मर्यादा नसते. व्यक्ती आपल्या क्षमतेनुसार कितीही काम करू शकतो. याच गोष्टीला पूर्णत्वास नेत आहेत लंडनमधील वयोवृद्ध लोक. येथील एका प्रक्रिया उद्योगात काम करणारे 69 वर्षांचे रेमंड इरविंग यांनी सांगितले की, मी या वयातही सक्षमपणे काम करू शकतो आणि यात मला काहीच अडचण नाही. ते या फर्ममध्ये काम करणारे सर्वात वयोवृद्ध व्यक्ती आहेत. तसेच त्यांना पेंशनही सुरू आहे. इरविंग निरंतर काम करत असल्यामुळे सध्यातरी निवृत्ती घेण्याची त्यांची कोणतीही योजना नाही. इरविंग फक्त एकटेच असे व्यक्ती नाहीत, तर ब्रिटनमध्ये वयाची सत्तरी गाठलेले सुमारे 5 लाख वयोवृद्ध व्यक्ती विविध ठिकाणी काम करत आहेत. 

 

ब्रिटन सरकारच्या माहितीनुसार, मागील एका वर्षात या वयोवृद्ध कर्मचाऱ्यांच्या संख्येत दुपटीने वाढ झाली आहे. जॉब साइट रेस्ट लेसनुसार, दर 12 व्यक्तींपैकी 1 व्यक्ती विविध ठिकाणी कार्यरत आहे. पण एका दशकापूर्वी याचे प्रमाण 22 पैकी एक होते. ही संस्था 50 पेक्षा जास्त वय असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर संशोधन करते.

 

वृद्धांना संधी दिल्याने अनुभवी कर्मचाऱ्यांची गरज भासत नाही
रेस्टलेसचे फाउंडर स्टुअर्ट लुईस यांनी सांगितले की, निवृत्तीनंतर काम करण्याची ही पद्धत महिला आणि पुरूषांमध्ये समान असते. ब्रिटेनमध्ये पुरुष आणि महिलांना शासकीय पेंशन मिळण्यासाठी 65 वर्षाचे असणे आवश्यक आहे. सेंटर फॉर एजिंग बॅटरचे सीनियर प्रोग्राम मॅनेजर पॅट्रिक थॉमसन यांनी सांगितले की, वयोवृद्ध लोकांना काम दिल्यामुळे अनुभवी कर्मचाऱ्यांचा शोध घेण्याची गरज नसते. तसेच, विघटनामुळे श्रम आणि कौशल्यावर वाईट परिणाम झाला आहे. त्यामुळे कंपनीने फ्लेक्झिबल वर्किंग सिस्टमचा अवलंब करायला पाहिजे.

 

वृद्धांच्या अनुभवाची सर कोणालाही नाही
चॅरिटी संस्थेच्या कॅथरीन फुट यांनी सांगितले, कंपनीने या वृद्धांना सवलत देणे आवश्यक आहे. कारण या कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो तसेच भेदभावाचाही सामना करावा लागतो. त्यामुळे फ्लेक्जिबल वर्किंग टाइम आणि पार्ट टाइम यासारख्या संधी देऊन वृद्धांना प्रोत्साहन दिले जाऊ शकते. विशेष म्हणजे, जो अनुभव आणि कौशल्य या वृद्धांकडे आहे, ते कोणीही आत्मसात करू शकत नाही. तसेच तज्ञांनुसार, या कर्मचाऱ्यांचे जीवमान वाढून आता 77 ते 90 वर्ष झाले आहे, त्यामुळे कंपन्यांनी वृद्ध माणसांकडे अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. यावर इरविंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे मत आहे की, या वयातही काम करून ते आपल्या गरजा पूर्ण करू शकतात. त्यांना कोणावरही अवलंबून राहण्याची गरज नाही.