आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रीसमध्ये तीन किमी खोलीवर सापडला 2400 वर्षे जुन्या जहाजाचा मलबा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अथेन्स - काळ्या समुद्रात २४०० वर्षे जुने ग्रीसमधील व्यापारी जहाजाचे अवशेष सापडले आहेत. येथे सापडलेले हे आतापर्यंतचे सर्वात जुने जहाज असल्याचा दावा केला जातो आहे. ७५ फूट लांबीचे जहाज ३ किमी खोलीवर सापडले. येथे ऑक्सिजन जवळपास नसतोच. यामुळे जहाजाचे अनेक भाग सुस्थितीत आहेत. 

 

समुद्री पुरातत्त्व विभागाच्या योजनेंतर्गत आजवर ६० हून अधिक सर्वात प्राचीन जहाजांचे अवशेष शोधण्यात आले आहेत. यात रोमसह १७ व्या शतकातील कोसेक युद्धातील ताफ्यात असलेल्या जहाजांचा समावेश आहे. कोसेक दक्षिण रशिया व दक्षिण-पूर्व भागातील लढवय्या समाजाचे लोक आहेत.
 
सखोल तपासासाठी दोन रोबोटिक यंत्रणा रवाना 
जहाज समुद्रतळापासून ३ किमी खाली होते. यासाठी त्याचा शोध करण्यासाठी दोन रोबोटिक यंत्रणा पाठवण्यात आल्या होत्या. या यंत्रणा रिमोटद्वारे नियंत्रित केल्या जात होत्या. याला लाइट व कॅमेरे बसवलेले होते. याच्या साह्याने व्यापारी जहाजाचा शोध घेतला. 

बातम्या आणखी आहेत...