आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

88 वर्षांचे सहजीवन; पत्नीने देह सोडताच 25 मिनिटांनी पतीनेही त्यागले प्राण, सोबतच निघाली अंत्ययात्रा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कैलाश आणि लीलादेवी यांची अंत्ययात्रा. - Divya Marathi
कैलाश आणि लीलादेवी यांची अंत्ययात्रा.

राजगड - येथील वृद्ध दाम्पत्य कैलाश नारायण सक्सेना (103) आणि त्यांची पत्नी लीलादेवी (100) यांची अंत्ययात्रा सोबतच निघधाली. अत्यंत सात्विकरित्या जीवन जगल्यानंतर या दोघांनी आश्चर्यकारकरित्या जगाचा निरोप घेतला. मंगळवारी सायंकाळी 5.10 वाजता दोघांनी चर्चा केली. त्यानंतर दोघांनी सोबत गायत्री मंत्राचा जप सुरू केला. जप सुरू असतानाच लीलादेवी यांनी अंतिम श्वास घेतला. सुमारे 25 मिनिटांनंतर कैलाश नारायण यांनीही सर्वांच्या उपस्थितीत गायत्री मंत्राचा जप करत प्राण त्यागले. कैलास आणि लीलादेवी यांच्या कुटुंबात 40 सदस्य आहेत. 


4 पिढ्या पाहिल्या... 
साध्या जीवनसरणीमुळे कैलाश नारायण यांना संतपुरुष म्हटले जायचे. त्यांनी चार पिढ्या पाहिल्या आणि दोन पिढ्यांना शिकवले होते. सक्सेना दाम्पत्याच्या अंत्ययात्रेच्या निमित्ताने महिला प्रथमच मुक्तीधाम स्मशानभूमीत पोहोचले. कैलाश नारायण यांच्या कुटुंबात नातू, पणतूंसह 40 सदस्य आहेत. कैलाश नारायण यांचे लग्न 15 व्या वर्षी झाले होते. 88 वर्षांच्या सहजीवनानंतर त्यांनी सोबतच जगाचा निरोप घेतला. 

 

बातम्या आणखी आहेत...