आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
न्यूयॉर्क- अमेरिकेतील मॉडेल आयरिस अॅफ्फेल यांनी वयाच्या ९७ व्या वर्षी जगातील सर्वात मोठी मॉडेल मॅनेजमेंट कंपनी आयएमजीसोबत करार केला आहे. याबद्दल बोलताना त्या म्हणाल्या, मला खूप आनंद झाला आहे. या वयात असे काही घडेल याची कल्पनाही केली नव्हती. सुरुवातीला मी यासाठी तयार नव्हते. पण अचानक असे काही घडले की, एका मासिकाच्या मुखपृष्ठावर माझे छायाचित्र दिसेल याचा कोणी विचारही केला नसेल. कोणत्याही व्यक्तीने निवृत्ती घ्यायलाच नको, असे मला वाटते. निवृत्ती मृत्यूपेक्षाही वाईट असते. मला काम करणे आवडते. त्यावरच माझे प्रेम आहे. आयएमजी मॉडेल व आयएमजी फॅशन प्रॉपर्टीजचे अध्यक्ष इवान बार्ट यांनी सांगितले, आयरिसचा उत्साह वाखाणण्याजोगा आहे. त्या अमेरिकन बिझनेसमन, इंटिरियर डिझायनर व फॅशन आयकॉन आहेत. या करारानंतर त्या गिगी हदीद, गिसेल बुंडचेन, लिली अॅल्ड्रिज व हलिमा अदन यासारख्या ब्रँडसाठी काम करतील. आयएमजी त्यांना मॉडेलिंग प्रकल्पासून ते इतर सर्व सुविधा देईल.
अॅफ्फेल यांच्यावर बनलाय माहितीपट
आयरिस यांचा जन्म २९ ऑगस्ट १९२१ रोजी झाला. २०१४ मध्ये अल्बर्ट मेयल्स या दिग्दर्शकाने त्यांच्या जीवनावर 'आयरिस' नावाचा एक माहितीपट तयार केला होता. २०१८ मध्ये त्याच्या नावावर 'आयरिस अॅफ्फेल : अॅक्सिडेंटल आयकॉन' ही बायोग्राफी लिहिली गेली आहे. हार्पर कॉलिन्स या बायोग्राफीचे लेखक होते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.