ऑटो एक्सपो 2020 / ओलेक्ट्राची ई-बस सी-9 लॉन्च; सेफ्टीसाठी बसवले खाच फीचर, ड्रायवरला झोप लागल्यावर वाजेल अलार्म

  • अडीच तासात होईल फुल चार्ज, चालेल 320 किलोमीटरचा

दिव्य मराठी वेब टीम

Feb 08,2020 02:31:28 PM IST

ऑटो न्यूज- ऑटो एक्सपो 2020 मध्ये हैदराबादमधील इलेक्ट्रिक बस मेकर ओलेक्ट्रा-BYD ने आपली नवीन इलेक्ट्रिक बस ओलेक्ट्रा C9 लॉन्च केली आहे. अद्याप या बसच्या किमतीबाबत कोणतीहीम माहिती समोर आली नाहीये. मीडिया डे च्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच 6 फेब्रुवारीला रोड अँड ट्रांसपोर्ट मिनीस्टर नितिन गडकरी याच्या हस्ते बस लॉन्च करण्यात आली. दमदार मायलेजसोबत अनेक खास फीचर्स या बसमध्ये आहेत.


320 किलोमीटरची रेंज


कंपनीने या इलेक्ट्रिक बसची माहिती देताना सांगितले की, ही बस खेरेदी करण्याचा व विचार मुंबई आणि हैदराबादमधील काही लोकांनी केला आहे. म्हणजेच येत्या काही दिवसात ही बस शहरामधील रस्त्यावर धावताना दिसेल. सध्या याची किंमत कंपनीकडून गुप्त ठेवण्यात आली आहे. कंपनीचे म्हणने आहे क, जीएसटी आणि सब्सिडीसारख्या गोष्टी लक्षात घेऊन लवकरच बसची किंमत सार्वजनिक केली जाईल.


120 किमी प्रती तासांची टॉप स्पीड


ओलेक्ट्रा C9 इलेक्ट्रिक बसमध्ये 600Ah कॅपेसिटी असलेली बॅटरी लावली आहे. कंपनीने सांगितले की, स्लो चार्जरवरुन ही बस 4 तासात आणि फास्ट चार्जने 2 ते 2.5 तासात बस फूल चार्ज होते. फुल चार्ज झाल्यानंतर बस 310 ते 320 किलोमीटरचा प्रवास करू शकेल. बसची हाय स्पीड 120 किलोमीटर प्रती तास आहे. यातील इलेक्ट्रिक मोटर 1800mn पीक टॉर्क जनरेट करते.


ओलेक्ट्रा C9 ई-बसचे इंटीरियर


ही बस आतून एकदम लग्झरी आहे. बसमध्ये ड्रायव्हरसीटसह 26 सीट्स आहेत. लास्ट रोमध्ये 5 आणि पुढील रोमध्ये लेफ्ट आणि राइट साइड 2-2 सीटचे कॉम्बिनेशन आहे. ड्रायवर सीटजवळ दुसरी सीट नाही. या सर्व सीटला पायलट सीटप्रमाणे डिझाइन केले आहे. म्हणजेच लांब पल्ल्याच्या प्रवासादरम्यान प्रवासी आरामात पास पसरून आराम करू शकतील.


ड्रायवरला झोप लागल्यावर वाजेल अलार्म


बसमध्ये ड्राइवर सीटसमोर सेंसिंग सिस्टीम लावले आहे. हे सिस्टीम ड्रायवरच्या चेहऱ्याला मॉनिटर करेल. म्हणजेच, ड्राइविंगदरम्यान ड्रायवहरला झोप लागल्यास बसमध्ये अलार्म वाजेल. तसेच, या बसमध्ये भारती कंपनी आय ट्रँगलने तयार केलेले GPS सिस्टीमदेखील बसवण्यात आले आहे. कंपनी यावर्षी अंदाजे 300 बस तयार करणार आहे.

X