आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Olympi 2020; English Lessons Are Being Taught To Japanies To Prevent Language Problems

जपानमध्ये भाषेची अडचण होऊ नये म्हणून दिले जात आहेत इंग्रजीचे धडे, यासोबतच पर्यटकांशी वागण्याचे प्रशिक्षणही

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ऑलिम्पिक संस्मरणीय करण्यासाठी कर्मचारी-विद्यार्थ्यांसाठी घेतले जात आहेत वर्ग
  • एप्रिलपर्यंत दररोज घेतला जाणार ३० मिनिटांचा वर्ग

टोकियो- जुलै २०२० मध्ये होत असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेला संस्मरणीय करण्यासाठी जपान चांगलीच मेहनत घेत आहे. स्पर्धेदरम्यान येथे येणाऱ्या पर्यटकांच्या हृदयात स्थान मिळवण्यासाठीही युद्धपातळीवर तयारी केली जात आहे. जपानची भाषा पर्यटकांसाठी गैरसोयीची ठरू नये म्हणून ४० हजार टॅक्सीचालकांसह विविध सेवाक्षेत्रांशी निगडित लोकांना इंग्रजी भाषेचा बेसिक अभ्यासक्रम शिकवला जात आहे.सरकारी, बिगर सरकारी कार्यालये, शाळांत काम संपल्यानंतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना याबाबतचे प्रशिक्षण दिले जात आहे. एखाद्या पर्यटकाने मदत किंवा प्रश्न विचारला तर कसे वागायचे, याचाही त्यात समावेश आहे. हे प्रशिक्षण एप्रिलपर्यंत दररोज अर्धा तास चालणार आहे. 

सद‌्भावना प्रदर्शनासाठी शाळेत वर्ग घेतले जात आहेत. सरकारचे म्हणणे आहे की ऑलिम्पिकदरम्यान येणाऱ्या पर्यटकांना अशा सुविधा व आतिथ्य केले जावे की जपानी संस्कृतीसारखे जगात दुसरे काहीच नाही असे त्यांना वाटावे. याबाबत टोकियोचे ६५ वर्षीय डॉक्टर मिनोरू इशिबाशी म्हणाले, आम्ही किती स्वच्छ आणि आतिथ्यशील आहोत, हे सिद्ध करूच. स्पर्धेदरम्यान आमची कमाई वाढेल, मात्र तिचे देशाच्या सन्मानापेक्षा जास्त मोल नाही. 


इशिबाशी हे शिक्षक चिचो कुसाला यांच्यासोबत मिळून १६ हजार टॅक्सीचालकांना दैनंदिन उपयोगाची इंग्रजी वाक्ये शिकवत आहेत. यात हॅलो, थँक्यू, सीटबेल्ट, प्लीज, वेलकम, इट्स माय प्लेझर, कीप द चेंज आदी वाक्यांचा समावेश आहे. आमाकी तकाशा या विद्यार्थ्याचे म्हणणे आहे की, शाळा संपल्यानंतर आम्हाला पर्यटकांशी कसे वागायचे हे शिकवले जात आहे.