आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Olympic Medalist Yogeshwar Dutt And Former Hockey Captain Sandeep Singh Join BJP

ऑलिंपीक पदक विजेता योगेश्वर दत्त आणि माजी हॉकी कर्णधार संदीप सिंग यांनी घेतला भाजपात प्रवेश

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- विधानसभा निवडणुकांच्या तारखा जशा-जशा जवळ येत आहेत, तसे पक्षात अनेक नवीन चेहरे येत आहेत. गुरुवारी ऑलिंपीक पदक विजेता कुस्तीपटू योगेश्वर दत्त, माजी हॉकी कर्णधार संदीप सिंग आणि कालांवालीचे आमदार बलकौर सिंह यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. दिल्लीमधील भाजप कार्यालयात प्रदेशाध्यक्ष सुभाष बराला यांच्या उपस्थितीत तिघांनी कमल हाती घेतले.

योग्श्वर दत्त म्हणाला- मी आतापर्यंत खेळ आणि पोलिस सेवेत राहून देशाची सेवा करत होतो. मी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विचाराने प्रभावित झालो आहे, त्यांना फॉलो करतो. राजकारणात येऊन देशासाठी चांगले काम केले जाऊ शकते. त्यामुळे भाजपात प्रवेश करत आहे."
संदीप सिंग म्हणाला- "भाजपला खूप आधिपासून फॉलो करतो. पंतप्रधान मोदी आणि हरियाणाचे मुख्यमंत्र्यांच्या कामापासून खूप प्रभावित झालो आहे. खेळानंतर राजकारणात येऊन देशासाठी काहीतरी चांगले करायचे आहे."योगेश्वर दत्त:
योगेश्वरने लंडन (2012)ऑलिंपीकमध्ये 60 किलोग्राम वजनी फ्रीस्टाइल रेसलिंगमध्ये कांस्य पदक जिंकले होते. त्याने 2014 इंचियोन एशियन गेम्स, 2010 दिल्ली कॉमनवेल्थ गेम्स आणि 2014 ग्लास्गो कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्ण जिंकले आहे. 2006 दोहा एशियन गेम्समध्ये कास्य पदक आपल्या नावावर केले आहे. योगेश्वरच्या नावावर एशियन चॅम्पियनशिपमध्ये दोन सुवर्ण आणि कॉमनवेल्थ चॅम्पियशिपमध्ये 3 सुवर्ण आणि दोन रौप्य पदक जिंकले आहे.संदीप सिंह:
संदीपने 2004 मध्ये भारतीय हॉकी टीममध्ये डेब्यू केला होता. तो 2010 कॉमनवेल्थ गेम्समध्ये रौप्य पदक जिंकलेल्या टीम इंडियाचा सदस्य होता. तो संघात असताना भारताने 2007 (बेल्जियम) चॅम्पियंस चॅलेंजमध्ये कास्य पदक जिंकले होते. संदीप कर्णधार असताना, भारतीय टीमने 2009(मलेशिया) सुलतान अजलान शाह कपमध्ये सुवर्ण जिंकले होते. 2009 ते 2010 पर्यंत संघाचा कर्णधार होता. संदीपला 2010 मध्ये अर्जुन अवॉर्ड मिळाला आहे.

बातम्या आणखी आहेत...