आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ॐ उच्चाराणे फक्त धार्मिक नाही तर हे खास आरोग्य लाभही होतात, याविषयी माहिती नसेल तुम्हाला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ॐ उच्चारणे फक्त धार्मिक नाही, तर आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. एम. पी. मेडिकल सायन्स विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आर. एस. शर्मांनी ॐच्या उच्चारणावर अनेक प्रकारचे संशोधन केले आहे आणि त्यांनी हे स्वतःवर करून पाहिले आहे. डॉ. शर्मा सांगतात की, रोज फक्त पाच मिनिटे 'ओम्'चे उच्चारण केल्याने मानसिक आणि शारीरिक फायदे होतात. 


कसे करावे ओम् उच्चारण? 
ओम् उच्चारण करण्यासाठी कोणत्याही पोझिशनमध्ये बसा. डोळे बंद करून दीर्घ श्वास घ्या आणि नंतर ओम् उच्चारण करत हळूहळू श्वास सोडा. या काळात पूर्ण शरीरात कंपन होईल याचा प्रयत्न करा. जर ओम् उच्चारण करताना कान बंद करता आले तर यापेक्षा जास्त फायदा होईल. 


ओम् उच्चारणाचे आरोग्यदायी फायदे 
थायरॉइडची समस्या
: ओम् उच्चारण केल्याने गळ्यामध्ये कंपने निर्माण होतात. यामुळे थायरॉइडच्या समस्येपासून बचाव होतो. 


अँग्झायटी : ओम् उच्चारण केल्याने अँग्झायटी, अस्वस्थपणा यांसारख्या समस्या दूर होतात. 


ताण आिण तणाव : ओम् उच्चारण केल्याने मानसिक शांतता मिळते. ताण आिण तणाव दूर होतो. 


रक्तप्रवाह : ओम् उच्चारण केल्याने शरीरामध्ये रक्तप्रवाह चांगला राहतो. रक्तामध्ये ऑक्सिजन वाढतो. 


सुदृढ हृदय : ओम् उच्चारण केल्याने फुप्फुस, रक्तदाब आणि रक्तप्रवाहात सुधारणा होते. यामुळे हृदय सुदृढ राहते. 


पचन : ओम् उच्चारण केल्याने पोटामध्ये कंपने निर्माण होतात. यामुळे पचन चांगले होते. 


ऊर्जा : ओम् उच्चारण केल्याने जास्त ऑक्सिजन मिळतो. रक्तप्रवाह चांगला होतोे. यामुळे ऊर्जा वाढते.

बातम्या आणखी आहेत...