Home | Gossip | Om Shanti Om Completes 11 years Of Release See On Location Photos

​ऑनलोकेशन@ओम शांति ओम: चित्रपटाला पूर्ण झाली 11 वर्षे, असा शूट झाला होता शाहरुखच्या मृत्यूचा सीन

दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 09, 2018, 12:24 AM IST

सर्व अॅक्टर्सच्या घडी, मोबाइल फोन आणि सोन्याच्या शिक्यांवर ओम लिहिले होते. हे सर्व कलाकारांना गिफ्ट म्हणून देण्यात आले.

 • Om Shanti Om Completes 11 years Of Release See On Location Photos
  चित्रपटात ओम मखीजा (शाहरुख खान) च्या मृत्यूचा सीन रिअॅलिस्टिक वाटावा यासाठी वी. मणिकंदन यांनी ट्रॉली कॅमे-याचा वापर केला होता.

  मुंबईः अभिनेता शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण स्टारर 'ओम शांति ओम' या चित्रपटाच्या रिलीजला आज (9 नोव्हेंबर) 11 वर्षे पूर्ण झाली आहेत. फराह खान दिग्दर्शित या चित्रपटाने 2007 साली बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली होती. या चित्रपटाच्या कथेसोबतच 32 स्टार्सवर चित्रीत झालेल्या 'दीवानगी' या गाण्याची खूप चर्चा झाली होती. या चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी वी. मणिकंदन यांनी केली होती. मणिकंदन यांनी या चित्रपटात एक भूमिकासुद्धा साकारली होती, हे तुम्हाला ठाऊक आहे का?


  फराहच्या आग्रहानंतर भूमिका साकारण्यासाठी झाले होते तयार...
  - एका इंग्रजी वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत मणिकंदन यांनी सांगितले होते, की चित्रपटात काम करण्याची त्यांची तयारी नव्हती. पण क्रू मेंबर्सनीसुद्धा चित्रपटात छोटा अॅक्ट करावा, अशी इच्छा जेव्हा फराहने व्यक्त केली ते मी तयार झालो.
  - मणिकंदन या चित्रपटात साऊथ इंडियन फिल्म 'माइंड इट'चे शूटिंग करताना दिसत आहेत.

  पहिल्यांदाच चित्रपटात एकत्र आले 32 फिल्म स्टार्स...
  - या चित्रपटातील 'दीवानगी' या गाण्यात धर्मेंद्र, रेखा, सलमान खान, संजय दत्त, सैफ अली खान, राणी मुखर्जी, तब्बू, गोविंदा, करिश्मा कपूर, शिल्पा शेट्टी आणि उर्मिला मातोंडकर सह 32 स्टार्स एकत्र आले होते. खास गोष्ट म्हणजे एवढे स्टार्स पडद्यावर एकत्र येण्याची ही पहिलीच वेळ होती.
  - सर्व अॅक्टर्सच्या घडी, मोबाइल फोन आणि सोन्याच्या शिक्यांवर ओम लिहिले होते. हे सर्व या कलाकारांना गिफ्ट म्हणून देण्यात आले होते.


  मणिकंदन यांनी फिल्मच्या शूटिंग सेटवरील काही फोटोजसुद्धा शेअर केले आहेत. हे फोटोज बघा पुढील स्लाईड्सवर...


  फोटो साभार : sify.com

 • Om Shanti Om Completes 11 years Of Release See On Location Photos
  एका सीनच्या शूटिंगदरम्यान मणिकंदन आणि दीपिका पदुकोण
 • Om Shanti Om Completes 11 years Of Release See On Location Photos
  दीपिका पादुकोण, शाहरुख खान, फराह खान आणि मणिकंदन ​
 • Om Shanti Om Completes 11 years Of Release See On Location Photos
  'दीवानगी' गाण्याच्या शूटिंग सेटवर सलमान खान आणिर धर्मेंद्र यांच्यासह इतर स्टार्स आणि क्रू मेंबर्स
 • Om Shanti Om Completes 11 years Of Release See On Location Photos
  'दीवानगी' गाण्याच्या शूटिंग सेटवर डिझायनर मनीष मल्होत्रा, शिल्पा शेट्टी, फराह खान, शाहरुख खान आणि मणिकंदन
 • Om Shanti Om Completes 11 years Of Release See On Location Photos
  'धूम ताना' गाण्याच्या शूटिंग सेटवर मणिकंदन, फराह खान, शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण
 • Om Shanti Om Completes 11 years Of Release See On Location Photos
  'दीवानगी' गाण्याच्या शूटिंग सेटवर संजय दत्त, सलमान खान, सैफ अली खान आणि शाहरुख खान

Trending