आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'उमर खालिदने अमरावतीमध्ये दंगल घडवून आणण्यासाठी चितावणीखोर भाषण केले', भाजपने आरोप करत शेअर केला व्हिडिओ

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • भाजपनेत्यांनी शेअर केलेला उमर खालिदचा व्हिडिओ 17 फेब्रुवारीचा असल्याचे सांगण्यात येत आहे

अमरावती- दिल्‍लीत झालेल्या हिंसाचारात आतापर्यंत 46 जणांचा मृत्यू झाला आहे तर 200 पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. यादरम्यान दिल्लीतील भाजप नेते तेजिंदर पाल सिंग बग्गा आणि काही इतर भाजप नेत्यांनी देशद्रोहाच्या प्रकरणातील आरोपी जेएनयू विद्यार्थी उमर खालिदचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात तो ट्रंप भारतात आल्यावर रस्त्यावर उतरण्याची अपील करत आहे. हा व्हिडिओ अमरावतीचा आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौऱ्यापूर्वी 17 फेब्रुवारीचा व्हिडिओ असल्याचे सांगितले जात आहे. ट्रम्प आल्यानंतर पुर्व दिल्लीमध्ये हिंसाचार भडकला.

भाजप नेते तेजिंदरपाल सिंग बग्गाचे ट्वीट-

व्हिडिओ शेअर करत भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीयने ट्विटरऴर लिहीले- ‘उमर खालिद आधीपासूनच देशद्रोहाच्या खटल्यात दोषी आहे, 17 फेब्रुवारीला त्याने अमरावतीमध्ये एक भाषण केले. तिथे त्याने मुस्लिम समाजातील लोकांना संबोधित केले आणि 24 फेब्रुवारीला डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौऱ्यादरम्यान रस्त्यावर उतरण्याची अपील केली. त्यामुळे दिल्लीतील हिंसाचार तुकडे-तुकडे गँगकडून झाल्याचे स्पष्ट होत नाही ?'

गांधींची शिकवण पायदळी तुडवली- उमर खालिद

या भाषणादरम्यान उमर खालिद म्हणाला होता, 'जेव्हा अमेरिकेचे राष्ट्रपती ट्रम्प भारतात येतील, तेव्हा रस्त्यावर उतरला. 24 फेब्रुवारीला ट्रम्प भारतात आल्यावर त्यांना दाखवून देऊत की, भारताची सरकार देशाला बिभाजित करू पाहत आहे. महात्मा गांधींच्या शिकवणीला पायदळी तुडवत आहे. देशातील जनता सरकारच्या विरोधात आहे. आपण सर्वजण त्या दिवशी रस्त्यावर उतरू.'

जेएनयूमध्ये घोषणा दिल्याचा आरोपी आहे खालिद

जेएनयूता विद्यार्थी नेते राहिलेल्या उमर खालिदचे नाव 2016 मध्ये यूनिव्हर्सिटीमध्ये झालेल्या घोषणाबाजीमध्ये आले होते. कन्हैया कुमारसोबत उमर खालिदलाही तुरुंगात टाकले होते. नुकतच दिल्लीतील अरविंद केजरीवाल सरकारने याप्रकरणी कन्हैया कुमारसह इतर अनेकांविरोधात देशद्रोहाचा खटला चालवण्याची परवानगी दिली आहे.