आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • For 25 Years Man Hid In A Cave, When People Get Into To See Him, They Could Not Believe After Seeing It From Inside

जगापासून दूर 25 वर्षे एका निर्मनुष्य गुहेत राहिला हा व्यक्ती; तिथे जाऊन पाहिले तेव्हा सर्वांनाच बसला आश्चर्याचा धक्का...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मॅक्सिको- न्यु मॅक्सिकोमध्ये एका व्यक्तीने जगावेगळा कारनामा केला आहे. रा पाउलेट असे या व्यक्तीचे नाव असुन त्यांनी जवळपास 25 वर्षांपासून एका सुनसान गुहेत आपले जीवन व्यथित केले. लोक जेव्हा रा पाउलेट यांची गुहा पाहायला गेले तेव्हा गुहेतील दृश्य पाहून त्यांना आश्चर्याचा धोका बसला. रा पाउलेट यांनी एकट्याने 25 वर्षे गुहेच्या आतील भागात कोरीव काम केले. 

 

गुहेला बनवले सुंदर महाल

25 वर्षांपूर्वी पाउलेट आपल्या कुत्र्यासोबत या गुहेत आले होते. त्यांनी ही गुहा पाहील्यानंतर या गुहेच्या भिंतीवर कोरिव काम करण्याचे ठरवले आणि त्यांनी कामाला सुरूवात केली. या 25 वर्षांच्या कालावधीत त्यांनी सर्वांचा त्याग केला. पाउलेट यांनी सांगितल्यानुसार, ' ते गुहेत कोरिव काम करत असताना दिवसाचे तासनतास गुहेतील दगडांना छन्नी हातोड्याने आकार देत होते. मनात येईल त्या आकृती दगडांवर कोरत होते.' ते म्हणतात, 'जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीवर प्रेम करतात तेव्हा संपुर्ण वेळ तुम्ही त्याच गोष्टीवर समर्पित करतात. याच प्रेरणेतून पाउलेट यांनी 25 वर्षे या गुहेच्या आतमध्ये कोरीव काम केले.' आज पाउलेट यांच्या या सुंदर गुहेने अख्या जगाचे लक्ष वेधून घेतले आहे.

 

याआधीही समोर आल्या आहे अशा घटना

पाउलेट यांच्यासारख्याच अनेक व्यक्तींनी निर्मनुष्य गुहांना महालाचे रुप दिले आहे. अनेकांनी पैसे खर्च करुन तर कोणी आपले आयुष्य खर्च करुन गुहांचे रुप पालटले आहे. दक्षिण आफ्रिकेमध्येही एक रहस्यमय गुहा समोर आली होती.

 

बातम्या आणखी आहेत...