आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

15 ऑगस्टला राज्‍यातील सर्व शाळांतून निघणार \'तंबाखू से आझादी\' प्रभातफेरी, घ्यावी लागणार शपथ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चोपडा (जळगाव) - राज्‍यातील प्रत्‍येक विद्यार्थी व्‍यसनमुक्‍त आणि आरोग्‍यसंपन्‍न रहावा यासाठी येत्‍या 15 ऑगस्‍टरोजी शिक्षण विभाग (महाराष्‍ट्र), राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण प्रकल्प (NTCP) यांसह इतर संघटनांच्‍या मदतीने तंबाखूमुक्‍त शाळा हे महत्‍त्‍वकांक्षी अभियान राबविले जाणार आहे.

 

त्यानुसार या स्‍वातंत्र्यदिनी ध्वजारोहण संपल्यानंतर प्रत्येक शाळा तसेच कार्यालये, रुग्णालये या ठिकाणी तंबाखूमुक्‍त आयुष्‍य जगण्‍याची शपथ घेतली जाणार आहे. तसेच यानिमित्‍ताने 'तंबाखू से आजादी' या विषयावर शाळेने प्रभातफेरी काढावी, घोषणा फलक घेऊन शालेय परिसरात आणि गावात तंबाखूच्या दुष्परिणामांचा प्रचार करावा, विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना व्यसनमुक्त होण्यासाठी आग्रह धरावा, यासाठी शासनाद्वारे परीपत्रक काढण्‍यात आले आहे. या अभियानामध्‍ये राष्ट्रीय सेवा योजना (NSS), सलाम मुंबई फाउंडेशन, लायन्स क्लब, रोटरी क्लब आणि राज्यातील विविध संस्था-संघटनांनी सहभाग घेतला आहे.

 

अशा असतील घोषणा

१) तंबाखूमुक्त जीवन संकल्प.

२) तंबाखू, जर्दा / खर्रा, धूम्रपान ह्यांच्या दुष्परिणामांची मला जाणीव आहे.म्हणून मी जन्मभर ह्या व्यसनांपासून  दूर राहण्याचा संकल्प करीत आहे.

३) माझे घर आणि माझा आजूबाजूचा परिसर तंबाखू मुक्त राहावा, इतरांनी तंबाखूजन्य पदार्थांचा त्याग करावा यासाठी मी प्रयत्न करीन.

4) माझे घर, माझे गाव /शहर आणि माझा महाराष्ट्र तंबाखूमुक्त बनवेन.

 

 

बातम्या आणखी आहेत...