आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मतदान कार्डवर व्यक्तीऐवजी छापला कुत्र्याचा फोटो, आता निवडणूक आयोगावर ठोकणार अब्रु नुकसानीचा दावा

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुर्शिदाबाद जिल्ह्यातील रहिवासी सुनील कर्माकर यांच्या कार्डमध्ये चुका होत्या
  • मंगळवारी नवे कार्ड आले तेव्हा त्यामध्ये सुनील ऐवजी कुत्र्याचा फोटो लावला होता

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये एका व्यक्तीच्या वोटर आयडी कार्डवर त्याच्या फोटो ऐवजी कुत्र्याचा फोटो छापला. याबद्दल त्या व्यक्तीने भारतीय निवडणूक आयोगाविरुद्ध अब्रु नुकसानीचा खटला दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.  

मुर्शिदाबाद जिल्ह्याच्या रामनगर गावातील रहिवासी 64 वर्षीय सुनील कर्माकर यांनी सांगितले काही दिवसांपूर्वी माझे ओळखपत्र बनून आले होते. पण त्यामध्ये काही चुका होत्या. ज्यामुळे सुधारणेसाठी अप्लिकेशन दिले. मंगळवारी जेव्हा नवे कार्ड आले तेव्हा त्यामध्ये माझ्या फोटो ऐवजी कुत्र्याचा फोटो लावलेला मिळाला. 

माझा मुद्दाम अपमान केला 

सुनील यांनी आरोप केला की, नव्या आयडी कार्डवर ही चूक मुद्दाम केली गेली, जेणेकरून माझा अपमान केला जाऊ शकेल. कारण, ज्या लोकांनी आयडी कार्ड पाहिले, त्यांनी माझी खिल्ली उडवली. त्यामुळे मी निवडणूक आयोगाला कोर्टात खेचण्याचा निर्णय घेतला आहे.  

मतदान ओळखपत्रात असलेल्या त्रुटींमध्ये सुधारणा करण्यात सामील असलेले अधिकारी राजार्षि चक्रवर्ती यांनी सांगितले - चुका सुधारताना फोटोवर लक्ष गेले त्यानंतर त्यामध्येही सुधारणा केली गेली होती. मग कुत्र्याचा फोटो कसा छापला गेला हे माहित नाही. मात्र येणाऱ्या काळामध्ये त्यांना वोटर कार्ड दिले जाईल. 

बातम्या आणखी आहेत...