आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मतदानासाठी ड्युटीवर तैनात शिक्षकाचा मृत्यू, पोस्टमॉर्टममध्ये समोर आली ही माहिती

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गडचिरोली - नक्षलग्रस्त आणि अतिशय दुर्गम आदिवासी भाग असलेल्या एटापल्लीत एका शिक्षकाचा मृत्यू झाला. हेडरी येथील बेस कॅम्पमध्ये असताना त्यांना भोवळ आली होती. त्यांची ड्युटी एटापल्ली तालुक्यातील पुरसुलगोंदी येथे लावण्यात आली होती. रविवारी संध्याकाळी त्यांना भोवळ आली आणि मध्यरात्रीनंतर भल्या पहाटे सोमवारी त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की बापू गावडे यांना हेडरी येथील बेस कॅम्पवर भोवळ आली होती. नंतर समोर आलेल्या माहितीनुसार, त्यांना मिरगीचा आजार होता. प्रशासनाने दिलेल्या माहितीप्रमाणे, त्यांना भोवळ आली तेव्हा ते त्यांचे डोके एका दगडावर आदळले. याच अपघातात त्यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना उपचारासाठी रुग्णालयातही दाखल करण्यात आले होते. परंतु, अवघ्या काही तासानंतर सोमवारी भल्या पहाटे त्यांना मृत घोषित करण्यात आले आहे. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये सुद्धा डोक्याला इजा होऊन मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

दरम्यान, राज्यातील आदिवासी भागात नक्षलींकडून मतदान करू नका अशी धमकी देण्यात आली होती. तरीही नक्षल्यांच्या धमक्या झुगारून लावताना अनेकांनी मतदानाचा हक्क बजावला. परंतु, मतदानासाठीची वाट अतिशय खडतर आहे. कित्येक लोकांना अनेक किमी पायी जाऊन मतदान केंद्र गाठावे लागत आहे.