आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • On His Birthday Shahrukh Can Announce Upcoming Movie, Said 'working On Some Scripts, When Script Is Ready I Will Do It'

वाढदिवशी शाहरुख करू शकतो आगामी चित्रपटाची घोषणा, म्हणाला - काही स्क्रिप्ट्सवर काम करत आहे, स्क्रिप्ट तयार झाली की सज्ज होईन

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : शाहरुख खानने यावर्षी अद्याप एकाही चित्रपटाची घोषणा केलेली नाही. आता अशी चर्चा आहे की, कदाति तो आपल्या वाढदिवशी (२ नोव्हेंबर) आपल्या आगामी चित्रपटाची घोषणा करू शकतो. नुकतेच त्याला त्याच्या आगामी चित्रपटाबाबत विचारले तेव्हा तो म्हणाला, 'मी वेळ घेत आहे, विचार करत आहे. मी दोन-तीन स्क्रिप्ट्सवर कामदेखील करत आहे. त्या पूर्ण होताच मीदेखील सज्ज होईन. काही लोकही यावर काम करत आहेत. मी लवकरच यासंदर्भात घोषणा करेल. तोपर्यंत कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नये. एक किंवा दोन महिन्यात शरीर यष्टीबाबतही घोषणा करेल.'

अफवांनी मला आयडिया दिली
गेल्या काही वर्षांपासून शाहरुखचे नाव अनेक चित्रपटांसोबत जोडले जात आहे. यासंदर्भात तो म्हणतो, 'मी या चित्रपटात आणि मी त्या चित्रपटात, हे मी गेल्या काही वर्षांपासून ऐकत आलो आहे. खरे सांगायचे तर या अफवांनी मला नवनवीन आयडिया दिल्या आहेत. मी टारझन नावाचा चित्रपट करत असल्याचीही चर्चा होती. त्यानंतर ही चांगली भूमिका असून ती केली पाहिजे, असेही मला जाणवले.'

प्रत्येक आयडियाने होऊ शकतो बदल
टेड टॉक्स शोबाबत शाहरुख म्हणतो, 'या शोची कल्पना थोडी वेगळी आहे. यात जे केले त्याबाबतच ते बोलतात. हा शो करत असल्यामुळे तुमच्याकडे आलेली प्रत्येक कल्पना काही ना काही बदल घडवू शकते, हे माझ्या लक्षात आले आहे. मात्र, तुम्ही ही कल्पना किती दूरपर्यंत घेऊन जाऊ शकता, हे तुमच्यावर अवलंबून आहे.'

प्लास्टिक वापरणार नसल्याचे दिले वचन
शाहरुख लवकरच टीव्हीवर 'टेड टॉक्स इंडिया : नई बात' या शोचे सूत्रसंचालन करताना दिसेल. नुकत्याच झालेल्या या शोच्या लॉन्चिंग इव्हेंटमध्ये शाहरुख आणि टेड टॉक्स इंडियाच्या टीमने 'नो प्लास्टिक यूज'चे वचन दिले आहे. या शोमध्ये यंदा वेगवेगळ्या भागातून २६ वक्ते सहभागी होतील. ते भारताततील आरोग्य सेवा, पर्यावरण जनजागृती आणि लैंगिक शोषण इत्यादी प्रमुख मुद्द्यांवर आपापली मते मांडतील. हा शो २ नोव्हेंबर रोजी शाहरुखच्या वाढदिवशी प्रीमियर केला जाईल.

बातम्या आणखी आहेत...