आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • On New Year's First Day Some Persons Burned 20 Vehicles; All Four Arrested After Investigation

एकीकडे नववर्षाचे स्वागत तर दुसरीकडे अज्ञातांनी केली 20 गाड्यांची जाळपोळ; तपासानंतर चौघांना अटक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सांगली : सांगली शहरात मंगळवारी रात्री नववर्षाचे स्वागत करण्यासाठी मोठी आतषबाजी सुरू असताना शंभर फुटी रस्त्यावरील पार्क केलेल्या १५ ते २० गाड्यांची तोडफोड करत त्या जाळण्यात आल्याची घटना घडली. मध्यरात्री अडीचच्या सुमाराला ही घटना घडली. पोलिसांनी बुधवारी सकाळी सीसीटीव्हीच्या आधारे चार जणांना अटक केली आहे. जाळपोळीत एक-दोन कार जाळण्यात आल्या, तर १८ दुचाकी गाड्यांची तोडफोड करून त्या जाळण्यात आल्या. संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

आठ जणांच्या टोळक्यांनी दारूच्या नशेत हे कृत्य केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत. ही घटना घडत असताना सामाजिक कार्यकर्ते आशिष कोरी हे १०० फुटी रस्त्यावरून जात होते. त्यांनी तातडीने पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी मध्यरात्री तीनच्या सुमारास घटनास्थळी जाऊन आग विझविली.