आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • On Set Of 'Nach Baliye', Prabhas Performs Romantic Dance With Ravina On 'Tip Tip Barsa Pani'

'नच बलिए' च्या सेटवर पोहोचली टीम 'साहो', रवीनासोबत 'टिप-टिप बरसा पानी' गाण्यावर प्रभासने केला रोमँटिक डान्स 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीव्ही डेस्क : 'बाहुबली' स्टार प्रभासचे फॅन्स कित्येक कोटी आहेत. पण तो स्वतः मात्र रवीना टंडनचा खूप मोठा फॅन आहे. प्रभासने याचा खुलासा डान्स शो 'नच बलिए-9' च्या सेटवर केला. एवढेच नाही त्यादरम्यान प्रभास आणि रवीनाने 'टिप-टिप बरसा पानी' या गाण्यावर रोमँटिक डान्सदेखील केला.  
 

 

रवीनाचे यलो लव्ह... 
शोमध्ये प्रभास आणि रवीना टंडन, टिप-टिप बरसा पानी या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. 1994 मध्ये अक्षय कुमार आणि रवीना टंडन स्टारर चित्रपट 'मोहरा' चे हे गाणे खूप प्रसिद्ध झाले होते. या गाण्यात रवीना यलो साडीमध्ये दिसली होती. एपिसोडच्या या दिवशीही रवीनाने येलो साडीच परिधान केली होती.  
 

श्रद्धा कपूरदेखील दिसली... 
प्रभाससोबत श्रद्धा कपूर आपल्या अपकमिंग चित्रपट 'साहो' चेच प्रमोशन करताना दिसली. सुजीतच्या या दिग्दर्शनात बनलेला चित्रपट 'साहाे' 30 ऑगस्टला 'हिंदी', 'तमिळ', 'मल्याळम' आणि तेलगु या भाषांमध्ये रिलीज होणार आहे. चित्रपटात नील नितिन मुकेश, महेश मांजरेकर, मंदिरा बेदी, चंकी पांडेय आणि जॅकी श्रॉफदेखील दिसणार आहेत. 

बातम्या आणखी आहेत...