आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • On Social Media, Aamir Khan's Daughter, Irra Called Sona Mohapatra Aunty, Sona Reacts On Ira's Post

सोशल मीडियावर आमिर खानची मुलगी इराने सोना महापात्राला संबोधले 'आंटी' तर सोनाने दिली अशी प्रतिकिया

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : आमिर खानची मुलगी इरा खान इंस्टाग्रामवर खूप सक्रिय आहे आणि बऱ्याचदा आपल्या पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्याशी निगडित अपडेट्स शेअर करत असते. अशातच काही फोटो शेअर करून इंटरेस्टिंग स्टाईलमध्ये सांगितले की, ती पहिल्यांदा एक प्ले करत आहे. इराने लिहिले, "स्वतःमध्ये आत सोना महापात्रा जागवत आहे. पहिल्यांदा आपला प्ले कुठेतरी घेऊन जात आहे. तुमची ऊर्जा आणि प्रतिभेला एका परफॉर्मरप्रमाने प्रसारित करत आहे, सोना आंटी."

आंटी म्हणाल्यामुळे सोनाने दिले असे उत्तर... 


इराची ही पोस्ट सोनाने वाचली आणि तिने आपल्याला आंटी म्हणल्याबद्दलही उत्तर दिले. सोनाने कमेंटमध्ये लिहिले. "तू मला यापूर्वी कधी आंटी म्हणाली नाहीस, त्यामुळे आताही त्रास घेऊ नकोस..." यावर इराने पुन्हा रिप्लाय करत लिहिले, "मी नेहमीच तुम्हाला आंटी म्हणते, पण आनंद आहे की, तुमच्या कधी लक्षात आले नाही." यावर सोनाने पुन्हा रिप्लाय करून लिहिले, "मावशी माझी पहिली देसी पसंती असेल, जर तुझी इच्छा असेलच तर..."

डायरेक्टर आहे इरा... 


इराने 'यूरिपाइड्स मेडिया’ नावाचा प्ले दिग्दर्शित केला आहे, ज्याचे प्रयोग भारतातील निवडक शहरांमध्ये केले जाणार आहेत. हा डायरेक्टर म्हणून तिचा पहिलाच शो आहे, ज्याचा प्लॉट ग्रीक मायथोलॉजीमधून घेतला गेला आहे. यामध्ये जास्तीत जास्त ट्रॅजिक स्टोरीज आहे. प्लेचा प्रीमियर डिसेंबरमध्ये होणार आहे. 

आमिरच्या एक्स वाइफची मुलगी आहे इरा... 


इरा आमिरची पहिली पत्नी रीना दत्ताची मुलगी आहे. पहिल्या पत्नीपासून त्याला दोन मुले आहेत, जुनैद आणि इरा. तर 2005 मध्ये आमिरने किरण रावसोबत लग्न केले होते, आमिर-किरणचा एक मुलगा आझाद राव खान आहे. 

बातम्या आणखी आहेत...