आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोचिंग क्लासचे सर रोज छेडतात, शाळकरी मुलींनी केली तक्रार; मग पोलिसांनी दिला चोप अन् चाटायला लावली थुंकी...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बेगूसराय(बिहार)- छेडछाड करणाऱ्या कोचिंग संचालकाला पोलिसांनी फक्त चोपच दिला नाही तर त्याला थुंकीसुद्धा चाटायला लावली. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. घटना बेगुसराय जिल्ह्यातील गढ़पुरा परिसरातील आहे. तेथे समस्तीपुर जिल्ह्यातील हसनपुर गावातील रहिवासी राजेश हा गुरुकुल कोचिंग क्लासेस चालवतो.

 

मुलींनी त्यांच्या कुटुंबीयांना सांगितले की, कोचिंग संचालक छेडछाड करतो, त्यावर गावात पंचायत बोलवण्यात आली. गावातील सरपंच आणि पोलिसांसमोर त्याला थुंकी चाटण्याची शिक्षा देण्यात आली. त्या वेळी उपस्थितीत असलेल्या पोलिस अधिकाऱ्याने त्याला चांगलाच चोप दिला. त्यानंतर त्याला 50 हजारांचा दंड भरायला लावला आणि नंतर त्याला सोडण्यात आले. 

 

बातम्या आणखी आहेत...