आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • On The First Day At Pushkar, 50 Thousand Light Shines In The Message Of 52 Ghats.

पुष्करमध्ये पहिल्या दिवशी ५२ घाटांवर मतदानाचा संदेश देत 50 हजार दीप उजळले..

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

>आतापर्यंत मेळ्यात ८ हजारांवर प्राणी, त्यात ४ हजार उंट सामील
> कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी १० लाख भाविक स्नान करणार

 

पुष्कर - राजस्थानमधील पुष्करमध्ये जगातील सर्वात मोठ्या पशू मेळ्याला सुरुवात झाली आहे. शुक्रवारी मेळ्याचे ध्वजारोहण झाले. हा मेळा २३ नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. या मेळ्यात सुमारे १० लाख लोक सहभागी होतील, असा अंदाज आहे. या मेळ्याची आेळख कार्तिक पौर्णिमेची जत्रा अशीही आहे. या निमित्ताने पवित्र स्नानासाठी भाविकांची अलोट गर्दी होते. आतापर्यंत ८ हजारांवर प्राणी आले आहेत. त्यात ४ हजार उंट, ३ हजार घोडे आहेत. 

 

या  मेळ्यात ८ प्रकारचे पशू विक्रीसाठी उपलब्ध करून दिले जातात. निवडणुकीवर डोळा ठेवून आयोजकांनी ५२ घाट ५० हजार दिव्यांनी उजळवून टाकले आहेत. त्याद्वारे ७ डिसेंबरला मतदानाचे आवाहनही केले आहे. दिव्यांसोबत मतदान जरूर करा, असा संदेश दिला आहे. 

 

कव्हर करण्यासाठी २५ हजार फोटोग्राफर
प्राण्यांच्या जत्रेचे वृत्तांकन, छायांकनासाठी देश-विदेशातील सुमारे २५ हजार फोटोग्राफर येथे दाखल झाले आहेत. मांडणा स्पर्धा, फुटबॉल, उंट सजावट, मटका स्पर्धा इत्यादींचे प्रमुख आकर्षण असते. मेळ्याला परदेशी पर्यटकही मोठ्या संख्येने भेट देतात. पशुपालकांची जीवनशैली टिपण्यासाठी फाेटोग्राफर्स येथे येतात. त्यामुळे या आयोजनाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

 

५१ लाखांचा ब्रह्मदेव घोडा आकर्षण
या मेळ्यात मुख्य आकर्षण ५१ लाखांचा ब्रह्मदेव घोडा व  भोलू नावाचे दोन रेडे आहेत. भोलूंची किंमत १.२० कोटी रुपये आहे. ते गुजरातच्या भावनगरचे जिल्ह्यातील आहेत. त्यांच्यावर दररोजचा खर्च सुमारे तीन हजार रुपये आहे. ब्रह्मदेव हा घोडा २२ महिने वयाचा आहे. त्याला २१ लाखांची बोली लागलेली आहे. परदेशी पर्यटक तेथे आवर्जून हजेरी लावतात. 

बातम्या आणखी आहेत...