आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिरियात नवव्या दिवशी तुर्कीने सैन्य मोहीम थांबवली, ५ दिवस शस्त्रसंधी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंकारा : तुर्कस्थानने सिरियातील कुर्द भागात नवव्या दिवशी हल्ले थांबवले. अमेरिकेचे उपराष्ट्रपती माइक पेन्स यांनी याबाबत घोषणा केली. पेन्स यांनी सांगितले की, कुर्द नेतृत्वातील सैन्य मागे हटावे यासाठी उत्तर सिरियातील आपली सैन्य मोहीम थांबवण्यास तुर्कस्थानने होकार दिला आहे. अंकारामध्ये पेन्स आणि तुर्कस्थानचे राष्ट्रपती रेसेप तैयेप एर्दोगन यांच्यात झालेल्या चर्चेनंतर ही घोषणा करण्यात आली. यानंतर तुर्कस्थानने सिरियातील आपल्या सर्व सैन्य मोहिमा पुढील पाच दिवसांसाठी थांबवल्या आहेत. या काळात कुर्द सुरक्षा दलाला सुरक्षित परत जाण्यास अमेरिकी सैन्य मदत करेल. ज्या भागात तुर्कस्तानला सुरक्षित भाग बनवायचा आहे त्या भागातून कुर्द सैन्य मागे घेतले जात आहे. युद्धविरामावर तुर्कस्तानला राजी करण्यासाठी माइक पेन्स अंकारा येथे अाले होते. ते सुमारे ९ तास थांबले होते. ८० मिनिटे त्यांच्यात आणि एर्दोगन यांच्यात चर्चा झाली. ट्रम्प यांनी दिलेल्या सल्ल्याकडे एर्दोगन यांनी दुर्लक्ष करत त्यांचे पत्र कचराकुंडीत फेकल्याचे वृत्त माध्यमांनी दिले आहे.

कुर्द सैनिकांना सुरक्षित निघण्यास अमेरिका करणार मदत
तुर्कस्तानने मोहीम थांबवल्यास प्रतिबंध हटवणार: अमेरिकी उप राष्ट्रपती

पेन्स यांनी घाेषणा करण्याआधी ट्रम्प यांनी एर्दोगन यांचे आभार मानत यामुळे लाखो लोकांचे प्राण वाचतील, असे ट्विट केले आहे. पेन्स यांनीही ट्विट करत ट्रम्प यांच्या नेतृत्वाचे आभार मानले आहे. तुर्कस्तानने पूर्णपणे सैन्य मोहीम थांबवल्यास त्यांच्यावर आर्थिक प्रतिबंध हटवले जातील.


सिरियन डेमोक्रॅटिक फोर्स कुर्दिश भागात तैनात
तीन लाख लोकांचे विस्थापन, ४०० पेक्षा जास्त मृत
्यू
कुर्दांना दूर ठेवण्यासाठी आणि ३६ लाख सिरियन निर्वासितांचे पुनर्वसन करण्यासाठी तुर्कस्तानला सिरिया सीमेवर ३० किमी परिसराला सेफ झोन बनवायचे आहे. इंग्लंडमधील सिरियन ऑब्झर्व्हेटरी फॉर ह्युमन राइट्सने म्हटले आहे की, कराराची माहिती मिळाल्यानंतरही या भागात संघर्ष सुरू आहे. तुर्कस्तानने ९ ऑक्टोबरला उत्तर-पूर्व सिरियात हल्ला केला होता. आतापर्यंत उत्तर सिरियातून ३ लाख लोक विस्थापित झाले आहेत. ४०० पेक्षा अधिक मृत्यू झाले आहेत.
आम्ही मोहीम स्थगित केली, थांबवली नाही : तुर्की परराष्ट्र मंत्री

तुर्कस्थानचे परराष्ट्र मंत्री मेवलूत चावूशालू यांनी सांगितले की, सिरियन डेमोक्रॅटिक फोर्स (एसडीएफ) सीमेवरून मागे हटल्यास तुर्कस्थानचे हल्ले कायमचे थांबवले जातील. आम्ही मोहीम स्थगित केली आहे, थांबवलेली नाही.
 
आयएसविरोधातील लढाईत एसडीएफची अमेरिकेला मदत
उत्तर सिरियातून सैन्याला माघारी बोलावल्यानंतर अमेरिकेवर टीका होत आहे. ट्रम्प यांच्या वक्तव्याने तुर्कस्तानला सिरियात हल्ला करण्यास हिरवी झेंडी दाखवली असल्याचे अनेक देशांचे म्हणने आहे. सिरियात इस्लामिक स्टेटविरोधातील लढाईत कुर्द सुरक्षा दलाच्या नेतृत्वातील सिरियन डेमोक्रॅटिक फोर्सेसने अमेरिकेला मदत केली आहे. मात्र, या अस्थिरतेमुळे उत्तर सिरियात जिहादी गटांचा उदय होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
 
युद्धविरामाच्या घोषणेनंतरही कुर्द नेतृत्वातील सिरियन डेमोक्रॅटिक फोर्स कुर्दिश भागात तैनात होते. रस्त्यावरून सैनिक तोफा घेऊन फिरत होते.
उत्तर सिरियात सैन्य मोहीम थांबवण्यास तुर्कस्थान तयार असल्याचे पेन्स यांनी केले स्पष्ट

बातम्या आणखी आहेत...