आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • On The Second Day Of Release 'Judgmental Hai Kya' Made A Collection Of 7 Crores, Arjun Patiyala' Could Earn Rs 1.25 Crore Only

रिलीजच्या दुसऱ्या दिवशी 'जजमेंटल है क्या'ने केले 7 कोटींचे कलेक्शन, 'अर्जुन पटियाला' कमावू शकला केवळ 1.25 कोटी रुपये 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : कंगना रनोट आणि राजकुमार राव स्टारर चित्रपट 'जजमेंटल है क्या' शुक्रवारी रिलीज झाला. पहिल्या दिवशी चित्रपटाने काही खास कमाई केली नाही. पण शनिवारी चित्रपटाने चांगले कलेक्शन केले. बॉक्स-ऑफिस इंडियानुसार, दुसऱ्या दिवशी चित्रपटाने 7 कोटींची कमाई केली. चित्रपटाने दोन दिवसात 11.50 कोटींचे कलेक्शन केले आहे.  

 

रविवारी कंगना-राजकुमारच्या चित्रपटाकडून विशेष अपेक्षा... 
पहिल्या दिवसाबद्दल बोलायचे तर चित्रपटाने 4.50 कोटींची कमाई केली. हा आकडा कंगनाचा आधीच चित्रपट 'मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी' च्या फर्स्ट डे कलेक्शनपेक्षा खूपच कमी आहे. 'मणिकर्णिका'ने पहिल्या दिवशी 8.75 कोटींची कमाई केली होती. मात्र दुसऱ्या दिवसाची कमाई पाहता 'जजमेंटल है क्या' पासून अपेक्षा आहे की, रविवारी हे कलेक्शन आणखी वाढेल. 

 

'अर्जुन पटियाला' ची कमाई घसरली...  
कृति सेनन आणि दिलजीत दोसांझचा चित्रपट 'अर्जुन पटियाला' शनिवारी केवळ 1.50 कोटींची कमाई केली. यापूर्वी ओपनिंग डेला या चित्रपटाने 1.25 कोटींची कमाई केली होती. दोन दिवसात या चित्रपटाने केवळ 2.75 कोटींचे कलेक्शन केले. दोन्ही चित्रपट वेगवेगळ्या धाटणीचे आहेत. एकीकडे कंगना-राजकुमारचा चित्रपट सस्पेंस थ्रिलर आहे तर कृति-दिलजीतचा चित्रपट कॉमेडीने भरपूर आहे.