आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आम्हाला 'एनडीए'तून काढणारे तुम्ही कोण? सामनाच्या अग्रलेखातून सेनेचा भाजपवर घणाघात  

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- शिवसेनेच्या केंद्रातील मंत्र्याने राजीनामा दिल्यानंतर आणि राज्यातील सेनेची काँग्रेस-राष्ट्रवादीशी जवळीक पाहता भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी शिवसेनेला NDA मधून बाहेरचा रस्ता दाखवला. त्यावर आता शिवसेनेचे मुखपत्र सामनातून भाजपवर टीका करण्यात आली आहे. सामनात म्हटले की, कोणत्या कारणाने भाजपने सेनेला एनडीएतून बाहेर काढले?समनातील अग्रलेखातून सांगण्यात आले की, "ज्या एनडीएतून शिवेसेनेला बाहेर काढण्यात आले, त्याची स्थापनी दिवंगत बाळासाहेब ठाकरे, माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी, भाजपचे जेष्ठ नेते लालकृष्ण आडवाणीसहित अनेक नेत्यांनी यांनी केली आहे. सेनेला एनडीएतून बाहेर काढण्यापूर्वी एनडीएतील इतर पक्षांची बैठक झाली होती ? का सगळा मनमानी कारभार सुरू झाला आहे. ज्यानेही सेनेला बाहेर काढण्याचे ठरवले, त्याला एनडीएचा मर्म आणि धर्म माहित नाही. ज्या नेत्यांच्या सांगण्यावरुन आम्हाला काढण्यात आले, एनडीएच्या स्थापनेवेळेस त्यांचा जन्मही झाला नसेल. जे काही झालं ते चुकीचं आहे." अशा शब्दात सामनातून भाजपवर टीकास्त्र सोडण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...