आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विश्व हिंदू महासभेचे प्रदेश अध्यक्ष रणजीत बच्चन हत्येप्रकरणी एका आरोपीला मुंबईतून अटक

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 2 फेब्रुवारी रोजी लखनऊमध्ये रणजीत बच्चन यांची गोळ्या घालून केली होती हत्या
  • हत्येनंतर आरोपीने मुंबईला केले होते पलायन

मुंबई - विश्व हिंदू महासभेचे प्रदेश अध्यक्ष रणजीत बच्चन यांच्या हत्येप्रकरणी एकाला मुंबईतून अटक करण्यात आली आहे. रविवारी (2 फेब्रुवारी) लखनऊ येथे बाइकस्वारांनी  रणजीत बच्चन (40) यांची गोळ्या घालून हत्या केली होती. याप्रकरणी एका आरोपीला पोलिसांनी मुंबईतून अटक केली आहे. या हत्येनंतर आरोपीने मुंबईला पलायन केले होते. 
रविवारी सकाळी अंदाजे सहा वाजता हिंदू महासभेचे अध्यक्ष रंजीत बच्चन आपल्या भावासोबत मॉर्निंग वॉकसाठी गेले होते. त्यावेळी हजरतगंज परिसरात सीडीआरआयजवळ काही बाइकस्वार हल्लेखोरांनी रणजीत आणि त्यांच्या भावावर गोळीबार केला. यात रणजीत यांचा जागीच मृत्यू झाला होता. समाजवादी पार्टीने योगी सरकारवर टीका करत या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला होता. 
 

बातम्या आणखी आहेत...