आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीड ऑनर किलिंग प्रकरणी मुख्य आरोपी अटकेत, बहिणीसोबत प्रेमविवाह केला म्हणून सख्या मेहुण्याची धारदार शस्त्राने हत्या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड- संपूर्ण शहराला हादरुन सोडलेल्या ऑनर किलिंगप्रकरणी पोलिसांनी मोठे यश आले आहे. सुमित वाघमारेच्या मारेकऱ्यांना पोलिसांनी मंगळवारी अकोला परिसरातून अटक केली आहे. पाच दिवसानंतर मुख्य आरोपी बालाजी लांडगे आणि संकेत वाघ हे दोघे फरार होते. सोमवारी कृष्णा क्षीरसागर (रा. विप्रनगर बीड) या आरोपीला पोलिसांनी सोमवारी पहाटे पुणे येथून अटक केली होती. या खून प्रकरणातील मुख्य आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी पाच पथके रवाना केली होती.


बीड शहरातील नाळवंडी नाक्याजवळील आदित्य अभियांत्रिकी कॉलेजसमोर बुधवार 19 डिसेंबर 2018 रोजी सुमीत शिवाजीराव वाघमारे (24, रा. तालखेड ता. माजलगाव, हमु. नागोबा गल्ली, बीड) या तरुणाची धारदार शस्त्राने वार करून खुन करण्यात आला होता . सुमितने त्याच्या नात्यातील भाग्यश्री लांडगे या तरुणीशी प्रेमविवाह केला होता. दोघे अभियांत्रिकीच्या पदवीचे शिक्षण घेत होते. परीक्षा देऊन बीडच्या आदित्य अभियांत्रिकी महाविद्यालयातून बाहेर पडत असताना भाग्यश्रीचा भाऊ बालाजी लांडगे व संकेत वाघ (दोघे रा. मित्रनगर, बीड) यांनी कारमधून येऊन सुमितवर वार केले होते. यातच त्याचा मृत्यू झाला. बालाजी लांडगे व संकेत वाघ या मुख्य आरोपींना पकडण्यासाठी बीड पोलिसांची पाच पथके रवाना करण्यात आली आली होती. दोन्ही आरोपींना अकोल्यातून अटक करण्यात आली आहे.

 

दरम्यान, खुनाच्या या कटात सहभागी असल्याच्या आरोपाखाली संशयित आरोपी कृष्णा क्षीरसागर (२४, रा. विप्रनगर, बीड) यास सोमवारी पहाटे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पुण्यातून अटक केली. सहायक निरीक्षक दिलीप तेजनकर, अमोल धस यांच्या पथकाने ही कारवाई केली.

 

आरोपीस न्यायालयासमोर हजर केले असता त्यास पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा.. घटनेचे फोटो..

बातम्या आणखी आहेत...