आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खेळता-खेळता काकाच्या घरी गेली दीड वर्षांची चिमुकली, अचानक ओरडण्याचा आवाज ऐकून आईने घेतली धाव, अवस्था पाहून बसला धक्का, प्रायव्हेट पार्टमधून होत-होता रक्तस्राव

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सीतामढी (बिहार) - जिल्ह्याच्या चोरौत परिसरात मंगळवारी दुपारी 35 वर्षीय काकाने दीड वर्षीय पुतणीवर रेप केला. चिमुकली काकाच्याच 3 वर्षांच्या मुलासोबत खेळत होती. बलात्कारानंतर आरोपी काका फरार झाला होता. चिमुकलीच्या रडण्याचा आवाज ऐकून आई धावत पोहोचली. तिची अवस्था पाहून आईला धक्काच बसला. मुलीच्या प्रायव्हेट पार्टमधून सतत रक्त वाहत होते. आई मोठमोठ्याने आक्रोश करत होती.

 

असे आहे प्रकरण...

आईची आरडाओरड ऐकून आसपासच्या लोकांनी धाव घेतली. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिस अधिकारी विकास कुमार यांनी पीडित मुलीला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रातील उपचारांनंतर गंभीर स्थिती पाहून डॉक्टरांनी तिला मोठ्या रुग्णालयात रेफर केले. पोलिसांनी आरोपी काकाला शोधून अटक केली. मुलीची आई आरोपी काकाला पाहून म्हणाली की, हा काका नाही राक्षस आहे.


बलात्काराचा आरोपी महेश दासने पत्नी आणि 3 मुलांना शेतात काम करण्यासाठी पाठवले होते...
मुलीच्या आईने सांगितले की, मंगळवारी त्यांची मुलगी आरोपी महेशच्या 3 वर्षीय मुलासेाबत खेळत होती. यादरम्यान आरोपीने आपल्या घरात कुणीच नसल्याचे पाहून मुलीवर रेप केला. दुसरीकडे मुलीला गंभीर स्थितीत सोडून फरार झाले. महेश 4 मुलांचा बाप आहे. दुसरीकडे पीडित मुलीचा चुलत काका आहे. घटनेच्या दिवशी त्याची पत्नी व मुले शेतात कामासाठी गेले होते.


मुलीचे वडील बाहेर गेले होते, तर आई घरात शिवणकाम करत होती
आइीर्ने सांगितले की, तिच्या दोन मोठ्या मुली आपल्या मामाच्या घरी गेलेल्या आहेत. घटनेच्या वेळी त्या घरात शिवणकाम करत होत्या. तिचा पती बाहेर गेलेला होता. यादरम्यान त्यांची मुलगी खेळत-खेळत आपल्या चुलत काकाच्या घरी गेली. शिवणकामात  मग्न असल्याने त्यांनी मुलीकडे लक्ष दिले नाही. ओरडल्याचा आवाज ऐकताच त्यांनी तिच्याकडे धाव घेतली. त्यांची मुलगी रक्तबंबाळ होऊन वेदनांनी विव्हळत होती.

 

मुलीच्या आईच्या जबाबावरून बलात्काराचा गुन्हा दाखल: पोलिस
पोलिस इन्स्पेक्टर विकास कुमार म्हणाले की, पीडित मुलीच्या आईच्या जबाबाआधारे अल्पवयीन मुलीवर रेपचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरीकडे आरोपी महेश दासला अटक करून तुरुंगात डांबण्यात आले आहे. महेशने चौकशीत आपला गुन्हा कबूल केला आहे.

 

 

बातम्या आणखी आहेत...