आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Virus Attack : भारतातील 1.5 कोटी अँड्रॉईड स्मार्टफोन्सवर 'एजंट स्मिथ' व्हायरसचा अॅटॅक; अमेरिकेत 3 तर इंग्लंडमध्ये 1.3 लाख अँड्रॉईड फोन्सवर प्रभाव

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गॅजेट डेस्क - भारतासह अनेक देशांतील 2.5 कोटी अँड्रॉईड युझर्सच्या फोनवर व्हायरस अॅटॅक झाल्याचे समोर आले आहे. इस्रायली सायबर सिक्योरिटी रिसर्च कंपनी चेक पॉइंटने ही माहिती दिली. कंपनीच्या मते, या घातक व्हायरसने भारतासारख्या विकसनशील देशांतील अँड्रॉईड युझर्सला आपला निशाणा बनवला आहे. या व्हायरसद्वारे व्हॉट्सअॅपसह इतर अॅप्स सुद्धा हॅक केले जातात. त्यांच्या ऐवजी डुप्लीकेट व्हर्जन इन्स्टॉल होतात. यानंतर हॅकर्स व्हायरसच्या मदतीने युझर्स पर्सनर डेटा चोरी करू शकतात. 


एजंट स्मिथ नावाचा मालवेअर  
चेक पॉइंटच्या मते 'एजंट स्मिथ' नावाचा हा मालवेअर डिव्हाइसला सहजरित्या अॅक्सेस करू शकतो.  मालवेअर युझरला पैशांबाबतच्या जाहीराती दाखवण्यात येते आणि त्याद्वारे युझरची बँकिंग डिटेल्स चोरी केली जाते. हा मालवेअर Gooligan, Hummingbad आणि CopyCatशी मिळता-जुळता आहे. 


भारताच्या 1.5 कोटी युझर्सवर व्हायरसचा हल्ला
फोर्ब्सच्या मते, भारतातील 1.5 कोटी अँड्रॉईड स्मार्टफोन्सवर या मालवेअरचा अॅटॅक झाला आहे. तर अमेरिकते 3 लाख आणि इंग्लंडमध्ये 1 लाख 37 हजार अँड्रॉईड स्मार्टफोन्सला या व्हायरसचा फटका बसला आहे. हा व्हायरस चीनच्या अलीबाबा ग्रुपचे 9apps.com या थर्ड पार्टी अॅपकडून फोनमध्ये आला आहे. या मालवेअरच्या हल्ल्यानंतर चेक पॉइंट कंपनीने युझर्सना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. 


काय आहे मालवेअर?
मालवेअर एक व्हायरसप्रमाणे काम करणारे सॉफ्टवेअर आहे. फोनमध्ये इन्स्टॉल होऊन युझरचा डेटा संक्रमित करू शकतो. हा व्हायरस इंटरनेट किंवा एखाद्या अॅप्लीकेशनच्या सहाय्याने कॉम्प्युटर, मोबाइल फोन यांसारख्या इतर इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेसमध्ये प्रवेश करू शकतो. यानंतर युझरचे कॉन्टॅक्ट्स, मेसेज, बँक डिटेल, लॉगइन आयडी यांसारखी खासगी माहिती व्हायरसच्या मदतीने चोरी केल्या जाते.