आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनेत्री केतकी चितळेवर अश्लील कमेंट करणाऱ्या एकाला अटक, मुंबई पोलिसांनी थेट औरंगाबादमध्ये येऊन केली कारवाई

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- अभिनेत्री केतकी चितळे विरोधात सोशल मीडियावर अश्लील कमेंट करणाऱ्या एकाला मुंबई पोलिसांनी थेट औरंगाबादमधून अटक केली आहे. सतीश पाटील असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तसेच केतकीच्या व्हिडीओखाली अश्लील भाषेत कमेंट करणाऱ्या इतर लोकांचाही शोध सुरू करण्यात आला आहे.


अभिनेत्री केतकी चितळेने काही दिवसांपूर्वी आपल्या चाहत्यांशी गप्पा करण्यासाठी फेसबूक लाईव्हवर मराठी ऐवजी हिंदी भाषेचा उपयोग केला. तसेच मराठीचा अट्टाहास करत कमेंट करणाऱ्यांना तिने उपरोधिक टोलाही लगावला होता. त्यावरुनच केतकीला अनेकांनी अश्लील भाषेत ट्रोलिंग करणे सुरू केले. त्यानंतर ट्रोलर्सना केतकीने सडेतोड उत्तरही दिले होते.


त्यानंतर केतकीने गोरेगाव पोलिस ठाण्यात या विरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर गोरेगाव पोलिसांनी केतकीच्या व्हिडीओवर अश्लील भाषेत कमेंट करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार गोरेगाव पोलिसांनी थेट औरंगाबादमधील सतीश पाटील या व्यक्तीला अटक केली आहे. तसेच येत्या काही दिवसात कमेंट करणाऱ्या लोकांना अटक करण्यात येणार आहे.

 

सोशल मीडियावर ट्रोलर्सना सडेतोड उत्तर देणाऱ्या अभिनेत्री केतकी चितळेने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली होती. ती म्हणाली "राज ठाकरेंनी स्वतःहून बोलवले आणि माझ्या धाडसाचे अभिनंदन केले. महिलांच्या दबलेल्या आवाजाला वाव मिळाला. त्यासाठी राज ठाकरेंनी माझे अभिनंदन केले." त्याशिवाय तिने 18 जूनला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली होती.