आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑनलाईन मुलगी दाखवून लग्नासाठी बोलावले, नवरदेव बनून आलेल्या 55 वर्षीय व्यक्तीचा खून; एकास अटक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • यापूर्वीही नवरदेवांवर हल्ले, मृत्यू झाल्याची गावातील पहिलीच घटना

विशाल घोलप 

करमाळा - ऑनलाईन पसंत पडलेल्या मुलीशी लग्न करण्यासाठी नवरा मुलगा बनुन आलेल्या वयस्कर व्यक्तीचा मारहाणीत मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना माढा तालुक्यातील भोगेवाडी येथे घडली होती. या प्रकरणाने जिल्ह्यात खळबळ उडवली होती. त्याचे धागेदोरे आता करमाळा पोलिसांनी शोधून काढले आहेत. या प्रकरणातील पहिल्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सदर आरोपीस मंगळवारी पंढरपूर येथून अटक करण्यात आली. ही घटना दिनांक 7 डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता घडली होती.
मल्हारी बाळु पालवे (वय 19) रा. मलवडी ता. करमाळा असे ताब्यात घेतलेल्या संशयीत आरोपीचे नाव आहे. तर अहमद अब्दुल्ला शेख (वय 55) रा. उस्मानाबाद असे मृत व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी जखमी राजेंद्र पेठे यांनी फिर्याद दिली होती.याबाबत अधिक माहिती अशी की, अहमद शेख (वय 52) यांच्या पहिल्या पत्नीचा 15 वर्षापूर्वी मृत्यू झाल्याने त्यांना दुसरे लग्न करण्याची इच्छा होती. त्यामुळे त्यांचे मित्र राजेश पेठे यांनी 'युट्युब'च्या साईट वरुन ऑनलाईन नवरी शोधली होती. त्यानंतर मुलीचा व शेख यांचा संपर्क फोनद्वारे करुन दिला. दोघांनी एकमेकांना पसंत केले. सदर मुलगी 32 वर्षीय असल्याचे सांगत तिच्या पतीचा मोटारसायकल अपघातात मृत्यू झाल्याचे सांगितले होते. यानंतर तर भोगेवाडी ता. माढा येथील महिलेचे आणि अहमद शेख यांचे फोनवर बोलणे सुरु झाले होते. यानंतर दिनांक 7 डिसेंबर रोजी अहमद शेख यांना लग्नासाठी आपल्या गावी बोलवण्यात आले. अहमद शेख आपले मित्र राजेंद्र पेठे यास सोबत घेऊन सदर गावी पोहचले. त्यानंतर कुर्डुवाडीत आल्यावर कार पुढे जाण्यास रस्ता नसल्याचे कारण सांगत शेख व मित्राला मोटरसायकलवर भोगेवाडी येथील माळरानावर आणले व मारहाण करुन सोने व रोख रक्कम असे एकुण 1 लाख 48 हजार रुपये काढुन घेतले. त्या मारहाणीत शेख यांचा मृत्यू तर पेठे हे जखमी झाले होते.
याबाबत अधिक माहीती अशी की, यापूर्वी करमाळा तालुक्यातही लग्नासाठी आलेल्या मुलांना लुटण्याच्या दोन वेगवेगळ्या घटना घडल्या होत्या. पण त्यात फक्त लुट झाली होती. पण यावेळी सदर आरोपींनी लुटीसह नवरदेवाचा मृत्यू झाला होता. त्यामुळे हे प्रकरण चांगलेच गाजले. यासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली टेंभुर्णीसह करमाळा पोलिसांचेही पथक तयार करण्यात आले होते. सदर प्रकाराबाबत माहिती असणारे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रकाश वाघमारे, प्रविण साठे, योगेश चितळे, मनिष पवार यांच्या पथकाने योग्य पद्धतीने तपास करीत माहितीदाराने दिलेल्या माहितीच्या आधारे मंगळवारी पंढरपूर येथे सापळा रचुन आरोपींपैकी एकास ताब्यात घेतले आहे. त्यामध्ये आणखी काही नावे उघड होण्याची शक्यता आहे. सदर आरोपीस ताब्यात घेऊन टेंभुर्णी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.