Home | Maharashtra | North Maharashtra | Nashik | one arrested in case of Check thief

खासगी नाेकरी मिळवून धनादेश चाेरत गंडा; नाशिक व ठाणे परिसरात दहा-बारा गुन्हे

दिव्य मराठी | Update - Aug 27, 2018, 10:05 AM IST

धनादेश चोरत बंॅकांतून परस्पर पैसे काढणाऱ्या भामट्यास नौपाडा येथे अटक करण्यात आली.

  • one arrested in case of Check thief

    नाशिक- बांधकाम व्यावसायिकांकडे ऑफिस बॉय, ड्रायव्हरची नोकरी करून त्या कार्यालयातून धनादेश चोरत बंॅकांतून परस्पर पैसे काढणाऱ्या भामट्यास नौपाडा येथे अटक करण्यात आली. पोलिस कोठडीत संशयिताने शहरात दहा आणि ठाणे येथे दोन-तीन गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.


    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रितेश विश्राम कर्डक बोगस नावाने ऑफिस बॉय, चालक अशा नोकऱ्या मिळवत होता. मालकाची नजर चुकवून धनादेश चोरून त्यावर बोगस सह्यांद्वारे रकमा काढत होता. अशा प्रकारे संशयिताने कुलकर्णी गार्डन येथील संजीव नवाल यांच्या कार्यालयात नोकरी मिळवत धनादेश चोरला होता. नवाल यांची बोगस सही करून त्याने ६० हजारांची रक्कम काढून घेतली होती. अशाच प्रकारे त्याने भद्रकाली परिसरात तीन, गंगापूरला दाेन, अंबड व पंचवटी प्रत्येकी एक आणि शहापूर, ठाणे शहरात नोकरी मिळवत वस्तू, धनादेश, एटीएम कार्ड अशा विविध स्वरूपात गंडा घातला.


    शहापूर पोलिस घेणार ताबा
    संशयिताने शहापूर, ठाणे हद्दीत अशाच प्रकारे गंडा घातल्याचा गुन्हा दाखल आहे. शहापूर पोलिसांचे पथक त्याचा ताबा घेणार असल्याची माहिती वरिष्ठ निरीक्षक मंगलसिंग सूर्यवंशी यांनी दिली.

Trending