आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सक्षम सहकार महामंडळासाठी सोलापुरातून एक कोटी निधी; शहर, जिल्ह्यातील पतसंस्था पुढे सरसावल्या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- राज्य सहकार महामंडळ सक्षम करून त्याच्यामार्फत पतसंस्थांतील ठेवीदारांना सुरक्षित करण्याचे अावाहन सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी केले. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत शहर व जिल्ह्यातील पतसंस्था एकवटल्या. महामंडळाचे समभाग घेण्यासाठी पुढे अाल्या. पाहता पाहता हा निधी एक कोटीपर्यंत गेला. या निधीतून पतसंस्थांतील ठेवीदारांना विम्याचे संरक्षण देण्याचे ठरले आहे. 
 
श्री. देशमुख यांच्या नेतृत्वाखाली रविवारी सकाळी शासकीय विश्रामगृहात याबाबत बैठक झाली. त्यासाठी नागरी सहकारी पतसंस्था, ग्रामीण बिगरशेती पतसंस्था आणि सेवक सहकारी पतसंस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. 
 
विशेष म्हणजे राज्य सहकारी परिषदेचे शेखर चरेगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती. महामंडळाचे व्यवस्थापक मिलिंद अाकरे, सहकार विभागाचे विशेष कार्य अधिकारी संतोष पाटील, जिल्हा उपनिबंधक अविनाश देशमुख, भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष दिलीप पतंगे यांच्यासह तालुका उपनिबंधक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
 
श्री. आकरे यांनी महामंडळाच्या सक्षमीकरणाचा मुद्दा मांडून त्यासाठी आर्थिक साहाय्याची अपेक्षा केली. त्याच्या माध्यमातून सहकारी पतसंस्थांना भविष्यात आर्थिक मदत करणे शक्य होईल. विविध उपक्रमांसाठीही मदत करता येईल, असे सांगितले. 
 
श्री. देशमुख यांनी मार्गदर्शन करताना महामंडळाच्या सक्षमीकरणाची गरज विशद केली. त्यांनी स्वत: ११ लाख रुपयांचा धनादेश आकरे यांच्याकडे सुपूर्द केले. त्यानंतर प्रत्येक संस्थेच्या प्रतिनिधींनी समभासाठी निधी देऊ केला. 
 
असे जमले पैसे 
लोकमंगल पतसंस्था (५१ लाख), लोकमंगल महिला सहकारी मुद्रणालय (२२ हजार), लोकमंगल ग्राहक भांडार (११ हजार), लोकमंगल कर्मचारी पतसंस्था (२ लाख), यशतंवतराव चव्हाण पतसंस्था (१ लाख), सन्मती ग्रामीण बिगरशेती पतसंस्था (५ लाख), मनकर्णा ग्रामीण बिगरशेती पतसंस्था, माढा (५ लाख), आर्यनंदी पतसंस्था (५ लाख), सद््गुरू ग्रामीण बिरगशेती पतसंस्था मोहोळ (३ लाख), ज्ञानेश्वर मोरे पतसंस्था वडवळ (३ लाख), म्हेत्रे महिला पतसंस्था बेगमपूर (३ लाख), रुक्मिणीदेवी पतसंस्था मार्डी (१ लाख), कालभैरव पतसंस्था बार्शी (१ लाख), स्वामी समर्थ पतसंस्था हत्तूर (१ लाख), विठ्ठल-रुक्मिणी पतसंस्था (५० हजार), राणी लक्ष्मीबाई पतसंस्था (५० हजार), अंगणवाडी पतसंस्था (५० हजार), सोनामाता शिक्षण संस्था (२५ हजार). 

बातम्या आणखी आहेत...